Crime News: पत्नीची मागितली माफी, पासवर्ड अन् बँक डिटेल्सही केले मेल; त्यानंतर अभियंत्याने 15 व्या मजल्यावरून...नेमकं काय घडलं?
Crime News: नोएडा सेक्टर-75 येथील पंचशील प्रतिष्ठा सोसायटीच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून एका आयटी अभियंत्याने काल (मंगळवारी) आत्महत्या केली. मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
Crime News: नोएडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोएडा सेक्टर-75 येथील पंचशील प्रतिष्ठा सोसायटीच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून एका आयटी अभियंत्याने मंगळवारी आत्महत्या (Crime News) केली. पोलिसांना मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती देताना एसीपी शैव्य गोयल यांनी सांगितले की, 36 वर्षीय पंकज हा पंचशील प्रतिष्ठा सोसायटीच्या टॉवर क्रमांक आठच्या फ्लॅट क्रमांक 1508 मध्ये पत्नी आणि मुलासोबत राहत होता. पंकजने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Crime News) केली. कोणीतरी पडल्याचा आवाज ऐकून सोसायटीतील सुरक्षा रक्षक घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता.
पंकज हा सेक्टर-126 मध्ये असलेल्या कंपनीत आयटी इंजिनिअर होता. पोलीस सोसायटीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. ही घटना घडली तेव्हा पंकजची पत्नी (Crime News) जालंधरला गेली होती. या घटनेची माहिती पत्नीलाही देण्यात आली आहे.
घटनेपूर्वी पंकजने आपल्या पत्नीशी मेसेज आणि मेलद्वारे संवाद साधला
घटनेपूर्वी पंकजने आपल्या पत्नीशी मेसेज आणि मेलद्वारे संवाद साधला होता. मेलमध्ये पंकजने लॅपटॉपसह पासवर्ड आणि बँकेशी संबंधित माहिती पत्नीला दिली आहे. अभियंत्याने आत्महत्येसाठी (Crime News) पत्नीची माफीही मागितली आहे. आयटी अभियंता उंचावरून ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी सर्वत्र रक्तांचा सडा पडला होता. याप्रकरणी मयत पक्षाकडून संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पंकज गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता, तो औषधही घेत होता. तो मूळचा पंजाबमधील जालंधरचा होता.