एक्स्प्लोर

आयटी कंपन्या माणुसकी हरवून बसल्या? की त्यांना जीवापेक्षा पैसा महत्वाचा?

कोरोनाचा वाढता धोका पाहाता राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन केला आहे. तर, आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं. मात्र, तरीही अनेक आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे.

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या आयटी कंपन्या माणुसकी हरवून बसल्यात का? जिवापेक्षा त्यांना पैसे महत्वाचा वाटतोय का? असे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे अख्खा महाराष्ट्र लॉकडाऊन असताना केवळ नुकसान होईल म्हणून आजही बहुतांश कंपन्या सुरू आहेत. पुण्याच्या हिंजवडीमधील टीसीएस कंपनीतून अशाच तक्रारी येऊ लागल्याने पोलीस थेट कंपनीत दाखल झाले. मात्र, नियमांचा पाढा वाचत कंपनीने काम सुरुच ठेवणार असल्याची मग्रुरी दाखवली. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र संपूर्ण बंद केला आहे. यासाठी अनेक आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचही आवाहन केलं. मात्र, अनेक आयटी कंपन्या याचं उल्लघन करताना दिसत आहे.

पुण्यात कोरोनाने शिरकाव केला अन् ही बातमी वाऱ्यासारखी आयटी इंडस्ट्रीमध्ये पसरली. तेंव्हापासून 'वर्क फ्रॉम होम'च्या मागणीने जोर धरला. आमच्या जीवाशी न खेळता 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा तातडीने द्यावी असं आयटीयन्स कंपनीकडे वेळोवेळी साकडं घालतायेत. जिल्हा प्रशासनाने देखील अनेकदा सूचना दिल्या. त्याचं पालन न झाल्याने आदेश ही दिले, पण कंपन्या मात्र आडमुठी भूमिकेवर ठाम राहिले. कंपनीने दिलेल्या तारखेत टार्गेट पूर्ण केलं नाही तर प्रोजेक्ट हातातून जातील, दुसऱ्या देशांशी संपर्क तुटेल अशी कारण कंपन्या पुढे करू लागले. आम्ही प्रत्येक आयटीयन्सची काळजी घेऊ. सॅनिटायजरने हात स्वच्छ करू, प्रत्येकाला मास्क बंधनकारक करू, दोघांमध्ये एक मीटरचे अंतर ठेऊन एकमेकांना संपर्कात येऊ देणार नाही. याची खबरदारी घेऊ असं कंपन्या आश्वस्त करू लागले. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यू'चं आवाहन केलं. रविवारी 22 मार्चला हा कर्फ्यू असल्याने साहजिकच आयटी कंपन्या त्यात सामील झाल्या. हाच 'जनता कर्फ्यू' संपण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'महाराष्ट्र लॉकडाऊन' केलं. अशातच एका नामांकित कंपनीतील आयटी अभियंता महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. त्यामुळं आयटी हबमध्ये खळबळ माजलीये, आयटीयन्समधील भीती आणखी गडद झालीये.

राज ठाकरेंकडून सरकारचं कौतुक, मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही : राज ठाकरे आज पासून महाराष्ट्र लॉकडाऊन केल्याने आयटी हब ठप्प करणं अपेक्षित होतं. पण बहुतांश आयटी कंपन्यांनी अनेक आयटीयन्सना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. अशातच फेज तीनमधील टीसीएस कंपनीतून काही आयटीयन्सनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रारी सुरु केल्या. काही काळ गोंधळ झाल्याचे ही पोलिसांच्या कानावर पडले, मग पोलिसांनी थेट कंपनी गाठली. पदाधिकाऱ्यांना गेटवर बोलावूनच पोलिसांनी खडेबोल सुनावले. मात्र नियमानुसार काम सुरुये, वीस टक्के कर्मचाऱ्यांची मुभा आहे. त्यानुसारच कर्मचारी बोलावलेत. टेली कम्युनिकेशन आणि बँकिंगसाठी गरजेचे असणारे कर्मचारी बोलावल्याचा दावा केला गेला. यातून एका अर्थाने कंपनीची मग्रुरी समोर आली.

Coronavirus | ब्लड बँकेत 10-15 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, रक्तदान करा : राजेश टोपे 

कंपनीने केलेला दावा आणि संख्या एकवेळ मान्य ही करू. पण कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जीव महत्वाचा की पैसा याचं प्राधान्य ठरवायला हवंच. कारण अख्खा महाराष्ट्र घरी बसून सरकारच्या नियमांचे पालन करत असताना आयटी कंपन्या सुरु ठेवल्या जातायेत. याच कंपन्यांमध्ये परदेशवारी केलेले अनेक कर्मचारी आहेत आणि त्यातच एक महिला आयटी अभियंतेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. अशा परिस्थिती रोजच आयटीयन्स कंपन्यात येणार असतील तर संसर्ग वाढण्याची शक्यता खूपच दाट आहे. मग 'महाराष्ट्र लॉकडाऊन'चा फायदा होणार कसा? कारण आयटीयन्सचा आयटी हब मधला वावर अनेकांच्या जीवावर बेतणारा आहे. तंत्रज्ञानाच्या जगात वावरणाऱ्या या कंपन्यांना हा धोका न कळण्याइतपत तरी ते अज्ञानी नसावेत. तेंव्हा पैश्यापायी माणुसकी हरवून बसलेल्या आयटी कंपन्यांनी हातातून वेळ निघून जाण्यापूर्वी जीवाला प्राधान्य द्यावं. कारण कोरोनाची चेन तोडायची असेल तर प्रत्येकानी स्वयंपूर्तीने होम कॉरंटाईन करणं हाच एकमेव पर्याय आहे.

......तर आयटीयन्स नी एकजूट व्हावं. कंपन्यांची आडमुठी भूमिका तर अनेकदा समोर आलेली आहेच. पण आयटी अभियंत्यांना देखील त्यांचा जीव महत्वाचा असेल तर त्यांनी देखील काही ठाम निर्णय घ्यायला हवेत. केवळ सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि माध्यमांकडे तक्रारी करण्यात धन्यता मानू नये. कारण दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढण्यात काहीच अर्थ नसतो. आता तुम्ही जीव की पैसा यातील प्राधान्यक्रम ठरवावं. जीव महत्वाचा असेल तर ठामपणे सर्व आयटीयन्सनी एकत्रित व्हावं आणि कामबंद ची हाक द्यावी. विना वेतन सुट्टी घ्यावी लागेल, मॅनेजर काय म्हणेल, कंपनी नोकरीवरून काढून टाकेल असे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी आपला जीव वाचवण्यासाठी आता कंपनीला लाथाडायला हवं. कारण जीव वाचवून आपण कोरोनावर मात केली. तर नंतर हजारो नोकऱ्या तुम्ही मिळवू शकता. पण कंपनीच्या भीतीपोटी कामावर आलात अन तुम्हाला कोरोनाची लागण झाली तर ते जीवानिशी उठेल.

Maharashtra Lockdown | नियोजनाअभावी बेस्टच्या दोन हजार बस मुंबईच्या रस्त्यांवर

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. बातमी लिहताना हा आकडा 89 पर्यंत पोहचला आहे. यात मुंबईत सर्वाधिक 39 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा – 12

पुणे मनपा – 15

मुंबई – 39

नागपूर – 4

यवतमाळ – 4

नवी मुंबई – 4

कल्याण – 4

अहमदनगर – 2

रायगड – 1

ठाणे – 1

उल्हासनगर – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

Raj Thackeray on #Corona | हात जोडून विनंती, हे प्रकरण सहज घेऊ नका - राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget