एक्स्प्लोर

राज ठाकरेंकडून सरकारचं कौतुक, मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही : राज ठाकरे

राज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदनही केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर चर्चा केल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मुंबई : कोरोना व्हायसरचा राज्यात झपाट्याने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचं, कामाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदनही केलं. सरकारला उपाययोजना करायला थोडा उशीर झाला आहे, मात्र सरकारनं योग्य पावलं उचलल्याचं राज ठाकरे म्हटलं आहे.

पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर बोलणं झालं. सद्यस्थितीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांना काही सूचना देखील केल्या आहेत. सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे, मात्र देशांर्तगत विमान सेवा सुरु आहे, ती बंद करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही

काही मुठभर लोकांना परिस्थिचीचं गंभीर्य कळत नाही. कालच बंद झाला, तो भारत बंद नव्हता, ती एक टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही, तर सरकारला गंभीर आणि कडक पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सरकारकडून नागरिकांना घरी थांबण्याचं आवाहन करुनही दुसऱ्या दिवशी वाहनं रस्त्यावर आली, चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. असं का करताय असा सवाल राज ठाकरेंनी लोकांना विचारला.

कोरोनाला सहज घेऊ नका

कोरोना व्हायरस देशात जास्त पसरला तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे आहे का? असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget