एक्स्प्लोर
Advertisement
इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षांची आत्महत्या
प्रदीप निंबाळकर यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं.
पुणे : इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप निंबाळकर यांनी गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. राहत्या घरी दुपारी तीन वाजता निंबाळकरांनी स्वतःवर गोळी झाडली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर यांची चारच दिवसांपूर्वी निवड झाली होती. अजित पवारांच्या उपस्थितीत एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती.
प्रदीप निंबाळकरांनी भवानी नगर भागातील घरात आपल्या खोलीत दुपारच्या सुमारास गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरात त्यांचा भाऊ आणि कुटुंबीय होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांना घरात सुसाईड नोट सापडली असून 'घरातील कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये' अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.
साखर कारखान्यात कामगारांसोबत दिवाळी बोनसवरुन वाद झाला होता. त्यामुळे आत्महत्येमागे आणखी काही कारणं आहेत का, हे पोलिस तपासून पाहत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी निंबाळकर यांच्या कुटुंबीयांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement