बारामती, पुणे : पुणे जिल्ह्यात रोज नवनव्या घटना समोर येत असतात. त्यात (Pune Crime news) छेडाछेडीच्या घटनादेखील समोर येत असतात. त्यातच पुण्यात अनेक कंपन्या आहेत, कॉलेज आहेत याठिकाणी होत असलेल्या विनयभंगाच्या तक्रारी समोर येतात. कधी बॉसकडून तर कधी काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकाकडून घाणेरड्या नजरा अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना झेलाव्या लागतात. त्यातच धमक्या किंवा अशा अनेक कारणं देत भीती दाखवून मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे अनेक प्रकार पाहिले आहेत. त्यातच बारामतीत मुलीच्या आई-वडिलांना दिलेले कर्ज व उचल स्वरूपात दिलेले पैसे माफ करतो असे सांगत मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


बारामती शहर पोलिसांनी मळद येथील भय्यावस्ती येथे राहणाऱ्या दत्तात्रय कुंभार याच्यावर पोस्को आणि ॲट्रॉसिटीसह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार 16 मे 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बारामतीच्या कसबाभागातील महालक्ष्मी कॉम्प्युटर्स येथे घडली. यामध्ये फिर्यादी मुलीच्या आई-वडिलांना दिलेले कर्ज व उचल स्वरूपात दिलेले पैसे माफ करतो असे सांगत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्यास नाही म्हटले असता आरोपी दत्तात्रय कुंभार याने तिचे तोंड दाबून त्याचे जवळील चाकूने तिच्या मानेवर वार करून पोटामध्ये चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद या मुलीने दिल्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस पुढील तपास करत आहेत.


गळ्यावर, मानेवर चाकुने वार


हे सगळं सुरु असतानाच मुलीला शारीरीक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थेट मुलीवर चाकुने हल्ला केला आणि तिच्यावर वारदेखील केला आणि तिला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. त्या माणासाचा शोध घेतला. दत्तात्रय कुभार असं त्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा: