Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC Graound) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत. मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा मतदाराला आपलंसं करण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यासाठीच शिवाजी पार्कची निवड करून ते थेट उद्धव ठाकरेंना शह देऊ इच्छितात, असं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईवर महायुतीनं लक्ष केंद्रीत केलंय. त्याचाच महत्वपूर्ण भाग म्हणून ही सभा पार पडत आहे. ज्याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.
शिवाजी पार्कात सभेची जय्यत तयारी
महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे सव्वालाख लोक या सभेला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलंय. मैदानावर सुमारे 75 हजार खुर्चांची व्यवस्था आहे. मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. 20 मे रोजी मुंबईचे सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी आज या महायुतीची भव्य सभा मुंबईत आहे. तीन पक्षांचे कार्यकर्ते, मतदार या सभेला येतील. त्यामुळे भव्य सभा होईल अशी अपेक्षा तिनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडीओ : PM Narendra Modi Sabha Mumbai : नरेंद्र मोदी, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा
महत्त्वाच्या इतर बातम्या :