एक्स्प्लोर

पुण्यात मुसळधार पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू, शेकडो वाहनं वाहून गेली

पुणे : शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो वाहनं वाहून गेली आहेत.

पुणे : शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो वाहनं वाहून गेली आहेत. अनेक घरांचं नुकसान झालं आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्यामुळे अनेक लोक अडकले आहे. स्थानिक लोकांकडून मदतकार्य सुरु आहे. पुण्यातल्या अरण्येश्वर भागातील टांगेवाला कॉलनीत मध्यरात्री पाणी भरायला लागल्यानंतर लोक आसरा शोधण्यासाठी शेजारच्या गंगातीर्थ सोसायटीमध्ये पोहचले. लोक सोसायटीच्या कंपाऊंड वॉल जवळ उभे असतानाच पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कंपाऊंड वॉल लोकांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक आंबील ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याचे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहराचा वीजपुरवठा बंद आहे. काही ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर्स पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. महापालिकेकडून सांगण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे सर्व पंप/मोटार नादुरूस्त झाले आहेत. परिणामी पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परिसर, सातारा रोड परिसर भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget