एक्स्प्लोर

Google : पुण्यातील गूगल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, अवघ्या काही तासात तेलंगणातून संशयित ताब्यात

Google Office Bomb Threat: मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी  सकाळी पुण्यातील गुगल ऑफिस उडवून देणार अशी धमकी देण्यात आली होती

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai News) धमकीचं सत्र सुरुच आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब (Bomb Blast) ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. गुगल इंडियाचं पुण्यातील (Google Office Bomb Threat) ऑफिस उडवण्याची धमकी देणारा मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन आला होता. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  तेलंगणामधून एका आरोपीला अटक (Suspect Arrest in Telangana) करण्यात आली असून तपास सुरु आहे. 

मुंबईमध्ये धमकीचे (Mumbai Threat) सत्र सुरुच आहे. सोमवारी (13 फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील (Pune News) गुगल ऑफिस उडवून देणार अशी धमकी देण्यात आली. मुंबईतील बीकेसी कार्यालयात (BKC Office) शिवानंद नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो हैदराबाद येथे राहत असल्याचे सांगितले. हा फोन लँडलाईनवरुन करण्यात आला होता. पोलिसांनी या संदर्भातील सर्व माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुगलच्या कार्यालयात कोणतीही संशयास्पद वस्तू मिळालेली नाही. तपास सुरु असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची एक टीम तेलंगणाला रवाना झाली आहे. धमकी देण्यामागे काय कारण होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 505 (1) (ब) आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) स्फोटाने उडवून देणार, अशी धमकी देण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीन (Indian Mujahideen) या दहशतवादी संघटनेच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळे विमानतळ आणि मुंबई पोलिसांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. तात्काळ याबाबत तपास करण्यात आला अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) स्फोटकाने उडवून टाकू, अशी धमकी या माथेफिरुने दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असं आपलं नाव सांगितलं होतं. त्यानंतर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका व्यक्तीला मुंबई परिसरामधून ताब्यात घेतलेलं आहे. या व्यक्तीने ही धमकी का दिली आहे, त्याचा धमकी मागील उद्देश काय आहे या संदर्भात अधिक चौकशी पोलीस करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

मुंबई विमानतळाला बाँबने उडवून देण्याची धमकी, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget