एक्स्प्लोर
बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली, तर आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. फसवणूक झाल्याची तक्रार 25 नागरिकांनी पोलिसात दिली होती.
पुणे : बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर मल्टीलेव्हल मार्केट पद्धतीची गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक करणारं रॅकेट पुणे पोलिसांच्या सायबर सेलने उद्ध्वस्त केलं. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली, तर आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
गेन बिटकॉईन नावाच्या कंपनीमध्ये एका गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉईन असे 18 महिन्यात एका बिटकॉईनचे 1.8 बिटकॉईन परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं, मात्र यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार 25 नागरिकांनी पोलिसात दिली.
पुण्यातल्या दत्तवाडी आणि निगडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. सायबर सेल पोलिसांनी सायबर तज्ञांच्या मदतीने या प्रकरणात तपास केला. आतापर्यंत या प्रकरणात तब्बल 2 कोटी 25 लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि हा फसवणुकीचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
गेन बिटकॉईन या कंपनीत नागरिकांना मल्टिलेव्हल मार्केटिंग अर्थात एमएलएमद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या आठ आरोपीना पोलिसांनी अटक केली. यामध्ये अजून खूप मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.
संबंधित बातमी :
नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement