एक्स्प्लोर

HECI वर यूजीसीचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांचे काही प्रश्न

यासंदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुणे : गेली सहा दशके असलेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) बरखास्त करुन उच्च शिक्षणाचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी नवी राष्ट्रीय नियामक संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. नव्या नियामक संस्थेचे नाव ‘भारतीय राष्ट्रीय उच्चशिक्षण नियामक आयोग’ (HECI) असे असेल. यासंदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अस्तित्वात येणाऱ्या नवीन संस्थेच्या आर्थिक नाड्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे असतील. त्यामुळे निधी कसा वळवायचा, कशाला प्राधान्य द्यायचं यासंबंधी मंत्रालयाकडून योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेवर निगवेकर यांनी शंका उपस्थित केली. सध्या वेगवेगळ्या शाखांमधील उच्चशिक्षणाचं नियमन करण्यासाठी शाखानिहाय संस्था केंद्र पातळीवर अस्तित्वात आहेत. (उदा. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, अॅग्रीकल्चर कौन्सिल) त्यामुळे जर यूजीसी बरखास्त करून नवीन नियामक संस्था अस्तित्त्वात येत असेल तर, या सगळ्या संस्था एका छत्राखाली आणणे आवश्यक असल्याचंही निगवेकर यांनी सांगितलं. पण या दृष्टीने नव्या आयोगात तरतूद केली की नाही याची शहानिशा करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. यूजीसी आणि HECI मध्ये फरक काय? या दोन्ही संस्थांमध्ये मोठा फरक आहे. यूजीसीकडे विद्यापीठांचं नियमन करण्याचा आणि मान्यता देण्याचा अधिकार आहे. HECI कडे हा अधिकार नसेल. HECI अस्तित्त्वात आल्यानंतर निधी थेट मनुष्यबळ विकास मंत्रीलयाकडून दिली जाईल. यूजीसीकडून आपल्या वेबसाईटवर बनावट संस्थांची केवळ यादी जाहीर केली जातो, मात्र HECI कडे अशा बनावट आणि खराब गुणवत्ता असलेल्या संस्था बरखास्त करण्याचा अधिकार असेल. 7 जुलैपर्यंत सूचना मागवल्या केंद्र सरकारने या ड्राफ्टबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर या ड्राफ्टचं कायद्यात रुपांतर होईल. सध्या मोदी सरकारचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी उरला आहे. त्यामुळे तातडीने हे विधेयक पास करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक सादर केलं जाईल. संबंधित बातमी : जावडेकरांचा मोठा निर्णय, यूजीसी रद्द, नव्या आयोगाची स्थापना

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget