एक्स्प्लोर

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. उद्या सकाळी 11 वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाबर पोटाच्या विकाराने त्रस्त होते.  पोटावरील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळेच 26 जानेवारीला ते त्यांच्या बँकेत ध्वजारोहणासाठी हजर होते. पण त्यानंतर पुन्हा अपचनामुळं त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना चिंचवडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मात्र तब्येत खालावल्याने पुढच्या उपचारासाठी बाणेरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्या आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. बाबर यांची 1997मध्ये बायपास सर्जरी झाली होती, 1999मध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया तर 2014 मध्ये मणक्याची शस्त्रक्रिया ही झाली होती. यातून ते जोमाने उभे राहिले. पण पोटाच्या विकाराने मात्र त्यांना अधिकच असह्य केलं अन यातच त्यांचं निधन झालं.

गजानन बाबर यांचा प्रवास 

पिंपरी चिंचवडमध्ये 1974 साली गजानन बाबर यांनी शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आणि बाबर शहरात सक्रिय झाले. महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले, एकदा विरोधी पक्षनेते पद ही भूषवलं. 1995 आणि 1999ला हवेली विधानसभेतून ते आमदार झाले . 2004च्या विधानसभेत पराभूत झाले शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख पद  देखील भूषवले. 

2009च्या लोकसभेत मात्र नवनिर्मित मावळ लोकसभेतून पहिले खासदार म्हणून निवडून आले. साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्षांपासून ते संचालक होते. तर विद्यमान उपाध्यक्ष पद त्यांच्याकडेच होतं. 2014च्या लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. नाराजीतून त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि कालांतराने स्वगृही परतले. शहराचे संपर्क प्रमुख सचिन अहिरांनी त्यांची नुकतीच भेट घेतली, त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होऊ लागले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget