एक्स्प्लोर
पिंपरीत भर दिवसा धुकं पडल्याने चर्चांना उधाण
पिंपरी चिंचवडच्या पूर्व आणि उत्तर भागात भर दिवसा धुकं पडल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पुणे: पिंपरी चिंचवडच्या पूर्व आणि उत्तर भागात भर दिवसा धुकं पडल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गुरुवारी सकाळी सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. यामुळं आकुर्डी, निगडी परिसर धुक्यात गडब झाला होता. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भरदिवसा पंधरा मिनिटांचा हा निसर्गाचा खेळ चिंता निर्माण करणारा आहे. त्यामुळंच परिसरातील नागरिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. एरव्ही पहाटे पडलेलं धुकं सकाळी उशिरापर्यंत असलेलं आपण पाहिलं आहे. मात्र अचानक धुकं पडून, सुमारे 15 मिनिटात गायब झाल्याने, निसर्गाच्या या अविष्काराची चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये रंगली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















