एक्स्प्लोर

पुण्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन पहिली बस अहमदनगरमध्ये दाखल

पुण्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस आज अहमदनगरमध्ये दाखल झाली. यानंतर या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

पुणे : स्वारगेट डेपोमधून आज पुण्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस आज रवाना झाली. पुण्यातून अहमदनगरला ही बस गेली. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अहमदनगरकडे ही बस रवाना झाली. देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता राज्यातील कानाकोपऱ्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिक, गरजू लोकांना घरी पोहचवण्यासाठी लालपरी धावणार आहे. पुण्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना घरी पोहचवण्यासाठी पहिली बस रवाना झाली.

पुण्याहून नगर जिल्ह्यात जाण्यासाठी 43 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली होती. यापैकी 20 विद्यार्थ्यांना घेऊन ही बस रवाना झाली. सृजन फौंडेशन व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. गेला दीड महिना स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यात अडकून आहेत. जेवणाची आबाळ, आर्थिक चणचण यामुळे आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ते करत होते. एमपीएससी स्टूडंट राईट संस्थेनं गोळा केलेल्या माहितीनुसार जवळपास 2300 विद्यार्थी पुण्यात अडकले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचीही जाण्याची व्यवस्था करण्यात येईल असं एमपीएससी स्टूडंट राईटतर्फे सांगण्यात आलं.

लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना

घरी जाताना नियमांचं पालन हे विद्यार्थी जाताना त्यांनी सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं. तसंच त्यांच्या गावी पोहोचल्यानंतरही त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. आज घरी जाताना खूप आनंद होत असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. घरच्यांनाही खूप आनंद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. याच प्रकारे अन्य विद्यार्थ्यांनाही घरी पोहचवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

राजर्षी शाहू महाराजांबद्दलच्या 'त्या' ट्वीटबाबत देवेंद्र फडणवीसांकडून दिलगिरी

आजपासून लालपरी धावणार राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, मजुर आणि इतर लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी बसच्या माध्यमातून अशा गरजवंताना घरी पोहचवणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Lockdown 3 | पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे 20 विद्यार्थी गावाकडे रवाना | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Embed widget