Pune Fire | पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो नागरिकही या ठिकाणी दाखल झाले होते. यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण येत होत्या.
पुणे : पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पुण्यातील फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी इमारतीने वेढलेले आहे. या फॅशन स्ट्रीटमध्ये जाण्यासाठी छोटीशी वाट आहे. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग लागली त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे होत होते. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो नागरिकही या ठिकाणी दाखल झाले होते. यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण येत होत्या.
आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तर आग नेमकी कशाने लागली याची मिळालेली नाही. आगीच कपड्यांची दुकानं असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे.