एक्स्प्लोर

आर्थिक दिवाळखोरीतील लवासा प्रकल्पाच्या खरेदीसाठी बोली लावण्यास आज अखेरची मुदत

पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प आर्थिक दिवाळखोरीत गेला आहे. हा प्रकल्प खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना बोली लावण्यास 20 नोव्हेंबर ही अखेरची मुदत असणार आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना बोली लावण्यास 20 नोव्हेंबर ही अखेरची मुदत असणार आहे. लवासा प्रकल्पासाठी बोली लावण्यास शुक्रवारपर्यंत किती गुंतवणुकदार पुढे येतात आणि त्यांच्याकडून अपेक्षित रकमेची बोली लावली जाते का यावर लवासा प्रकल्पाचे आणि या प्रकल्पात वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

लवासा प्रकल्प आर्थिक दिवाळखोरीत गेल्यावर 2018 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार लवासा प्रकल्पाची जबाबदारी रिझोल्युशन प्रोफेशनलकडे सोपवण्यात आली आहे. लवासा प्रकल्पातील मालमत्तांची विक्री करुन लवासात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची देणी भागवण्यासाठी रिझोल्युशन प्रोफेशनलकडून या आधी अनेक बड्या गुंतवणूकदारांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत अपेक्षित गुंतवणूकदार मिळालेला नाही.

लवासा प्रकल्पासाठी 17 बॅकांनी मिळून सहा हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे तर बॉन्डच्या आणि घर खरेदीच्या स्वरुपात लवासामधे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. या गुंतवणूकदारांची देणी भागवण्यासाठी लवासा प्रकल्पातील मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिक दिवाळखोरीतील लवासा प्रकल्पाच्या खरेदीसाठी बोली लावण्यास आज अखेरची मुदत लवासा (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)

लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून 2000 साली पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या परिसरात तब्बल 25 हजार हेक्टर परिसरात लवासा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात आली. लवासा प्रकल्प हा स्वातंत्र्यानंतरचं पहिलं हील स्टेशन असेल असा दावा त्यावेळी हा प्रकल्प उभारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच हा प्रकल्प जमीन खरेदी असेल किंवा पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन असेल यामुळे वादामध्ये राहिला. 2010 साली तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासा प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच लवासा प्रकल्पाच्या आर्थिक अडचणींना सुरुवात झाली. काम बंद करण्याचे आदेश दिल्याने कंपनीचे शेअर्स शेअर मार्केटमधे मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यातूनच पुढे लवासाने आर्थिक दिवाळखोरीही जाहीर केली. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या परंतु अर्धवट अवस्थेत असलेल्या लवासा प्रकल्पाचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget