एक्स्प्लोर
पुण्यात मुलीसह डॉक्टर पित्याची विष पिऊन आत्महत्या
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील उंड्री येथे एका बंद घरात मुलीसह वडिलांचा मृतदेह आढळला आहे. विष प्राशन करून चार ते पाच दिवसांपूर्वी दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोंढवा परिसरात राहणाऱ्या किरण पाटील नावाच्या व्यक्तीनं मिहाझा पाटील या आपल्या 17 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणारे किरण पाटील हे पेशानं डॉक्टर आहेत. बंद घरातील हे दोन्ही मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाले आहेत.
परिसरातील रहिवाशांना घरातून दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement