एक्स्प्लोर

प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं निधन

ब्र, कुहू सारख्या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका कविता महाजन यांचं न्यूमोनियाने निधन झालं.

पुणे : ब्र, भिन्न सारख्या वेगळ्या विषयांवरील लेखनामुळे नावारुपास आलेल्या प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात न्यूमोनियामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता महाजन 51 वर्षांच्या होत्या. स्त्री अस्मितेचा हुंकार आपल्या लेखनातून मांडणारी हरहुन्नरी लेखिका अशी त्यांची ओळख होती. 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ब्र' या कथासंग्रहामुळे कविता महाजन नावारुपास आल्या. याशिवाय त्यांनी लिहिलेली भिन्न, कुहू, ग्राफिटी वॉल यासारखी पुस्तकंही गाजली. कविता महाजनांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. न्यूमोनियाचं निदान झाल्यामुळे कविता महाजन यांना पुण्यातील चेलाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजार बळावल्यामुळे स्वाईन फ्लूच्या चाचण्याही केल्या, मात्र त्यांना स्वाईन फ्लू नसल्याचं स्पष्ट झालं. परंतु न्यूमोनियाने तब्येत खालावल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. कविता महाजन यांचं शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झालं होतं. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. कविता महाजन गेली दोन वर्ष 'एबीपी माझा'साठी 'चालू वर्तमानकाळ' आणि 'घुमक्कडी' या सदराखाली ब्लॉग लेखन करत होत्या. पुरस्कार 2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार 2008 मध्ये कवयित्री बहिणाई पुरस्कार 2011 मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी) 2013 मध्ये ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार कविता महाजन यांच्या अंतिम काळातील भावनिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Embed widget