पुणे पोलिसांच्या अपयशाची चर्चा, तपासाला वेग; ललित पाटीलचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत
Lalit Patil Drug Case: पुणे पोलिसांचे एक पथक हे मुंबईतच दाखल झाले असून साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : गेले पंधरा दिवस राज्याच्या गृहखात्यावर ढीगभर प्रश्न आणि भलामोठा ठपका ठेवून मोकाट फिरणारा ड्रग्जमाफिया (Drug Case) ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.ललित पाटीलला अटक करताच पुणे पोलिसांच्या तपासाला देखील वेग आला आहे. साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली असून लवकरच या दोन आरोपींचा ताबा घेणार आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात सध्या ललित पाटीलचे दोन सहकारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी झालेल्या दोघा आरोपींना पुणे पोलीस ताब्यात घेणार आहे. मात्र आरोपी ललित पाटील याची चौकशी करण्यासाठी त्यांनी पुणे पोलिसांना प्रवेश दिला नसल्याचे मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले. नाशिक ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी ललित पाटीलसह एकूण 15 आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे . नाशिक ड्रग फॅक्टरी प्रकरणाचा तपास करतायेत साकीनाका पोलीस तर ड्रग सिंडिकेट आणि ललित पाटीलने ससून रुग्णालयातून केलेल्या पलायनाचा तपास आहे पुणे पोलिसांकडे आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून पुणे पोलिसांचे एक पथक हे मुंबईतच दाखल झाले असून साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई पोलीसांना जमल ते पुणे पोलिसांना का जमलं नाही?
जे मुंबई पोलीसांना जमल ते पुणे पोलिसांना का जमलं नाही असाही प्रश्न विचारला जातोय. ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून आधीच पुणे पोलीस दलातील नऊ पोलीसांना निलंबित करण्यात आलय. त्यामुळे डागाळली गेलेली प्रतिमा ललित पाटीलच्या मुसक्या आवळून सुधारण्याची संधी पुणे पोलीसांना होती. मात्र पुणे पोलीसांनी ही संधी देखील गमावली. 'मी पळालो नव्हतो तर मला पळवून लावण्यात आलं होतं. तसेच पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून कोर्टात करण्यात आला आहे. ललित पाटीलच्या अटकेनंतर आणि त्यानं केलेल्या दाव्यानंतर विरोधकांच्या आरोपांना आणखी धार आलीय .
ललित पाटीलला नेमकं कोण पाठीशी घालत होतं?
तब्बल नऊ महिने ललित पाटील ससून रुग्णालयात होता. पोलीस, ससून रुग्णालयाचे डॉक्टर आणि येरवडा कारागृहातील अधिकारी यांना ललित पाटीलविषयी पूर्ण कल्पना होती. त्यामुळं या प्रकरणात ड्रग्ज तस्करीचं मोठं जाळं बाहेर येण्याची शक्यता आहे. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा समोर आले आहे. त्यामुळं पोलीस आणि रुग्णालय प्रशासन कुणाच्या आदेशावरुन काम करत होते? ललित पाटीलला नेमकं कोण पाठीशी घालत होतं? हे सर्वांसमोर येणं गरजेचं आहे.
हे ही वाचा :
Video :'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं', ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट