पुणे : नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालय 10 मे रोजी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी आशा आहे.  सनातन संस्थेच्या पाच सदस्यांवर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे.  पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयकडून शुक्रवारी 10 मेला निकालपत्राचे वाचन करण्यात येणार आहे. 


20 ऑगस्ट 2013 ला डॉक्टर दाभोलकरांची ते मॉर्नीिग वॉल्कला गेले असता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आधी या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि नंतर सी बी आय कडे सोपविण्यात आला.  मात्र दोन्ही यंत्रणांचा तपास चुकीचा ठरल्याचं पुढे निष्पन्न झालं आणि आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींन सोडून द्याव लागलं. 


कर्नाटकमधील एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना कर्नाटकातील या दोन हत्यांचा धागेदोरे सनातन संस्थेशी जोडले जात असल्याच आढळून आले. कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून दाभोलकरांच्या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपींची नावे समोर आली. कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सी बी आय ला दिली आणि अटकसत्र सुरु झाले.सचिन अंदुरे, शरद कळसकर , डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.


विरेंद्र तावडेने डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचला, कळसकर आणि अंदुरे यांनी डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. संजीव पुनाळेकरने आरोपींन पळून जाण्यास मदत केली तर विक्रम भावेने हत्येसाठी वापरलेली पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.


कोण होते नरेंद्र दाभोलकर?


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते. मात्र, अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना त्यांना हिंदूविरोधी मानत होत्या. त्यांच्या हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.


इतर महत्वाची बातमी-


Pune Koyta Gang : पुण्यात कोयते हल्ले सुरुच; सलग दोन दिवस भररस्त्यात कोयते घेऊन राडे


उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा