पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Raj Thackeray ) यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील सारसबाग परिसरात येत्या उद्या सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा असणार आहे. आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये सभा होणार आहे. या आधी सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचं योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
या सभेसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत.
17 मे च्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार ?
17 मेला महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडून होणार शक्तिप्रदर्शन आणि प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे मात्र परवानगी संदर्भात महापालिकेकडून अद्याप कुठलाही निर्णय नाही.2016 च्या शासन निर्णयानुसार दोन्ही पक्षांचे अर्ज निवेदनासह राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची महापालिकेने माहिती दिली आहे. या सगळ्यासंदर्भात
महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी अर्ज केल्याचा दावा केला आहे. शिवाजी पार्क मैदान न मिळाल्यास बीकेसीतील मैदानाचा दोन्ही पक्षांकडे पर्याय उपलब्ध आहे मात्र शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही पक्षाकडून आग्रह केला जात आहे. 17 मे च्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार ?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-