एक्स्प्लोर
मतदान करा, मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट मिळवा!
पुणे: राज्यातील 10 महापालिका निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान पार पाडणार आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगाकडून बरंच आवाहन केलं जातं. मात्र, बऱ्याचदा मतदार निवडणुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच आता मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी पुण्यात मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशननं एक नवा निर्णय घेतला आहे.
21 फेब्रुवारीला मतदान करणाऱ्या मतदारांना पुण्यातील मल्टीप्लेक्समध्ये सिनेमांच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर दुसरी हॉटेल असोसिएशननंही असाच एक निर्णय घेतला आहे.
मतदारांना 21 फेब्रुवारीला हॉटेलमध्ये मिष्टान्न (डेझर्ट) देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशन केलं आहे.
दरम्यान, 21 तारखेला मतदान होणार असून यावेळी मतदार नेमकं कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement