एक्स्प्लोर

जो राम का नही, वो किसी काम का नही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी

मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींना शेवटी हे लक्षात आलं की 'जो राम का नही, वो किसी काम का नही'. ते रामाकडे परत गेले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या दानपेटी चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहेत. आज नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींना शेवटी हे लक्षात आलं की 'जो राम का नही, वो किसी काम का नही'. ते रामाकडे परत गेले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले. पण केवळ राजकीय कार्यक्रम न करता त्यांनी यावेळी तरी थोडी का होईना रामरक्षा वाचावी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो असे ते म्हणाले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे शिरूर हडपसर यवत तळेगाव चाकण शिक्रापूर या उन्नत महामार्गाच भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळ आणि ओएमआर शीटमधील तफावतीबाबत मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारलं असता ते म्हणाले की ही परीक्षा अत्यंत वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा पालकाला गुणांबाबत किंवा ओएमआर शीटबाबत काही तक्रार असेल, तर त्यांनी थेट संबंधित यंत्रणेकडे जाऊन आपली तक्रार मांडावी. टीव्हीवर अशा प्रकारची एका विद्यार्थ्याची बातमी मी पाहिली असली तरी संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असून विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा अस यावेळी ते म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज भूमिपूजन झालेल्या तिन्ही प्रकल्पांमुळे चाकण-शिक्रापूर, हडपसर-यवत आणि पुणे-शिरूर महामार्ग तसेच पुणे व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. या प्रकल्पांचे नियोजन अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. काही ठिकाणी तब्बल चार मजली रस्ते पाहायला मिळतील. यात सर्वात खाली स्थानिक रस्ता, त्यावर आउटर रिंग रोड, त्यानंतर एलिव्हेटेड रस्ता आणि सर्वात वर मेट्रो धावणार आहे.भविष्यातील गरजा ओळखून मेट्रोचे नियोजन या प्रकल्पांसोबतच एकात्मिक पद्धतीने करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मेट्रोसाठी होणाऱ्या स्वतंत्र खर्चात जवळपास 40 टक्क्यांची बचत होईल असंही ते म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget