Manoj Jarange Patil: 'फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात अन्...', मनोज जरांगेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Manoj Jarange Patil: 'आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही'; विधानसभा निवडणुकीबाबतचा निर्णय वेळ आल्यावर जाहीर करणार, काय म्हणाले जरांगे? जाणून घ्या सविस्तर
पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा देणारे आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यासाठी सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. आज मनोज जरांगे हे पुण्यात आहेत, यावेळी ते बोलताना म्हणाले, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 पाडायचे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा आम्ही बैठक घेऊ आणि त्यामध्ये ठरवू काय करायचं ते, निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. आताच आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही, असंही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात अन्...
यावेळी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, आंतरवाली येथे येऊन आमचाच चहा पिऊन जातात, त्यांचा आम्हाला काय उपयोग नाही. त्यांना काही फायदा नाही, आम्हाला काही फायदा नाही, मी त्यांना येऊ नका म्हणू शकत नाही. ते आंतरवालीत आले तरी आमचा काही तोटा नाही. त्यांना त्यांची घराणी पुढे येऊ द्यायची नाहीत. तीन पक्ष आणि उमेदवार द्यायचा एक,मग राहिलेले दोन आमच्याजवळ येतात आणि माझ्याजवळ कन्हतात, काय करावं विचारतात, आम्ही काय सांगाव आता त्यांनी काय करावं ते, मग तेच सांगतात ते घराणं चांगल नाही, त्यापेक्षा तुम्ही कोण दिला तर त्यालाच आम्ही निवडणून आणतो, जसं लोकसभेला झालं, तसंच आताही होणार आहे.
फडणवीसांचे जवळचे नेते देखील येतात अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे. खूप येतात मी फक्त आकडा सांगत नाही, ते मला रातभर झोपू देत नाहीत, मिडीयावाले गेले की ते येतात, आणि तुम्ही आलात की येत नाहीत, फडणवीसांबाबत ते तक्रारी करतात,फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत. गेल्या निवडणुकीत एकाला पुढं आणलं आता या निवडणुकीत त्याला मागं टाकतात असं त्यांचे नेते येऊन मला सांगतात. ते आमच्या-आमच्याच भांडण लावून देतो, त्यांच्या तक्रारी खूप आहेत, आमचं निवडणूक लढण्याचं ठरलं तर मग आम्ही सगळं बाहेर काढू असा इशारा देखील मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
त्यांच्यात नेत्यांनी सांगितलं आहे फडणवीस काय करतात, काय नाही, ओबीसी नेत्यांना हाताखाली धरतो, ओबीसींच्या नेत्यांबाबत का. बोलतो,ओबीसींच्या नेत्यांना फूस काय लावतो, आणि समाजाचा आंदोलन भरकटवतो, त्यांना नादी लावतो, मराठ्यांबाबत त्यांना असं करायचं होतं पण आम्ही नमुनेबाज आहे, आम्ही फुटत नसतो, आम्हाला त्याचे पैसे नको, त्याचं पद नको, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. बळचं लोक जमवून काहीही उपयोग होत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.