एक्स्प्लोर

Pune Citizen In Amarnath:अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील दोन भाविकाचा मृत्यू; इतर भाविकांशी संपर्क सुरु

अमरनाथ यात्रेला गेलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. यात एक भाविक पिंपरी चिंचवड तर दुसरे भाविक पुण्यातील आहेत.

Pune Citizen In Amarnath:अमरनाथ यात्रेला गेलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. यात एक भाविक पिंपरी चिंचवड तर दुसरे भाविक पुण्यातील आहेत. पिंपरी येथील पुरुष भाविक असून ते या संकटातून बाहेर आले होते, मात्र नंतर त्यांना हृदयवीकाराचा धक्का बसला होता. तर पुण्यातील एक महिलेचा मृतामध्ये समावेश आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान काल झालेल्या ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक अजुनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच काल झालेल्या या सगळ्या दुर्घटनेत पुण्यातील अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळत होती. 

पुण्यातील धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे देखील तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. ज्यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं आहे. धायरी मध्ये राहणारे महेश राजाराम भोसले,सुनिता महेश भोसले,प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे देखील बेपत्ता झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे.

पिंपरीतील मृत्यू झालेले नागरिक सुखरुप परतले होते. मात्र परतल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले, अशी माहिती अमरनाथ यात्रा आयोजक शुभम खेडेकर यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेसाठी यावर्षी पुण्यातून एकून 50 भाविक गेले होते. त्यातल्या अनेक नागरिकांशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.

अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला होता. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली होती यातच आतपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
Sunetra Pawar Pune Speech : सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं
सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget