एक्स्प्लोर

Daund News : दौंडमध्ये शरद पवार अन् अजित पवार एकाच मंचावर येणार

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एकाच मंचावर येणार आहे. दौंड तालुक्यातील एका शाळेच्या नूतन वस्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे एकाच मंचावर दिसणार आहे.

दौंड, पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) येणार एकाच मंचावर येणार आहे. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नूतन वस्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे एकाच मंचावर दिसणार आहे. 22 ऑक्टोबरला हा कार्यक्रम असणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदाच काका पुतण्या एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात एकमेकांबाबात काय बोलणार किंवा कौटुंबिक एकी दाखवणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

येत्या रविवारी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. नुकताच विद्या प्रतिष्ठानचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहे.  सोबत या संस्थेचं विश्वस्त मंडळही उपस्थित असणार आहे. 

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दुसऱ्यांदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. मात्र दोघांनी नजरानजर केली नव्हती. अजित पवार शरद पवारांच्या मागून निघून गेल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर साखर संकुलाच्या बैठकीच्या वेळी दोघे एकमेकांसमोर य़ेणार असल्याची शक्यता होती मात्र त्यावेळी अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे आता दोघेही थेट विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी अनंतराव पवार या शाळेचं उद्घाटन होणार आहे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोचरा वार केला होता. त्यापूर्वीही अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका टिपण्णी करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

 
इतर महत्वाची बातमी-
 
 
 
 
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Embed widget