एक्स्प्लोर

Honey Trap : तुम्हालाही सुंदर मुलीचा 'तसला' व्हिडीओ कॉल आलाय का? मग ही बातमी तुमच्यासाठी, हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?

DRDO च्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणानंतर 'हनी ट्रॅप' हा विषय चांगलाच चर्चेत आला. त्यामुळे 'हनी ट्रॅप' म्हणजे काय? आणि जाळ्यात अडकू नये यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी.

Honey Trap :  DRDO च्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यांनी भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं समोर आलं आहे. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून त्यांनी हे कृत्य केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. मात्र या प्रकरणानंतर 'हनी ट्रॅप' हा विषय चांगलाच चर्चेत आला. त्यामुळे 'हनी ट्रॅप' म्हणजे काय? आणि जाळ्यात अडकू नये यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी, पाहूया...

हनी ट्रॅप म्हणजे काय?

मोहात पाडू शकणाऱ्या किंवा सुंदर महिलेचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे आणि विविध कारणांसाठी त्याचा वापर करुन घेण्याच्या पद्धतीला 'हनी ट्रॅप' म्हणतात. या गैरप्रकारातून मिळवलेल्या माहितीचा वापर आर्थिक घोटाळ्यांसाठी, राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथवा देशांमध्ये हेरगिरी करण्यासाठी केला जातो. काही वेळा खंडणी किंवा ब्लॅकमेलिंगच्या उद्देशानेही हनी ट्रॅप लावले जातात.

हनी ट्रॅपमध्ये कसं अडकवलं जातं?

सायबर पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करणारे आणि डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक रोहन न्यायाधीश सांगतात की, "एका तरुणाशी महिलेने ओळख वाढवली नंतर ते व्हिडीओ कॉलवर बोलू लागतात. तरुणाला नंतर एक व्हिडिओ कॉल येतो आणि ज्यावेळी हा कॉल उचलला त्यावेळी समोर एक महिला बोलत असते. तरुण देखील तिच्याशी बोलू लागतो. बोलता बोलता महिला तरुणाचा विश्वास जिंकते. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर बोलणारी महिला नग्न होते. त्यानंतर ती तरुणालादेखील निर्वस्त्र होण्यास सांगते. भूलथापांना बळी पडलेला या व्हिडीओ कॉल दरम्यान तरुणाचा नग्न व्हिडीओ महिला रेकॉर्ड करते. 

यावेळी समोर सहसा मुलगी नसून एखादा व्हिडीओ हा लॅपटॉपवर प्ले करुन मोबाइलच्या जवळ नेला जातो जेणेकरुन व्हिडीओ नसून लाईव्ह व्हिडीओ आहे, असे भासवले जाते. हा व्हिडीओ पाठवत असताना त्यामध्ये पेलोड म्हणजे स्पायवेअर किंवा मालवेअर हे टाकले जाते. त्यामुळे मोबाईल फोन किंवा लॅपटॉपचा अॅक्सेस समोरच्या हॅकरकडे जातो आणि आपल्या न कळत आपला सर्व डेटा आणि मोबाईल फोन, लॅपटॉपचा अॅक्सेस हॅकरला मिळतो. ज्यामुळे हॅकर न कळत आपले फोटो काढू शकतो. मायक्रोफोनच्या मदतीने बोलणे ऐकू शकतो, लोकेशन बघू शकतो, लाईव्ह स्ट्रेंजमिनिंग करु शकतो आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या मोबाईल फोनच्या मदतीने आपल्याला न कळू देता मिळवू शकतो.

सावधगिरी कशी बाळगाल?

- आताच्या जमान्यात कोण कसा 'ट्रॅप' लावेल सांगता येत नाही. त्यामुळेच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात पडू नका. 
- कोणालाही तुमची वैयक्तिक माहिती पाठवू नका. पाठवली तर त्यासंदर्भातील पुरावे आपल्याकडे ठेवा.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेले फोटो, व्हिडीओ डाऊनलोड करु नका.
- सोबतच फोन, लॅपटॉपवर आलेले डॉक्युमेंट्स लगेच डाऊनलोड करुन ओपन करु नका.
- फ्रीमध्ये उपलब्ध असलेले anti virus मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये वापरु नका.
- सतत मेसेज करणाऱ्या व्यक्तीला काम नसल्यास लगेच ब्लॉक करा. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget