पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने

  (Pune drugs)  पुण्यात तब्बल 1100 कोटी (Pune Drugs racket) रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 650 किलो पेक्षा अधिक वजनाचे मेफेड्रॉन (Mephedrone) म्हणजेच एमडी सापडले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त देशातच नसून इतर देशात देखील पोहोचलेले आहे याचा सखोल तपास सुरू आहे मात्र शिक्षणाच्या माहेर घरात एवढे किमतीचे ड्रग्स कोण आणतयं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होऊ लागला आहे.


पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदमात छापा टाकून तसचं कुरकुंभ मधून एकूण 1100 कोटी रुपयांपेक्षा आधिक मेफेड्रोन म्हणजेच एम डी जप्त केलं आहे. वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय करोसिया आणि हैदर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 


-18 फेब्रुवारी: पुण्यात एम डी ड्रग्स विक्री केल्याप्रकरणी 3 जणांकडून तब्बल 4 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त


-19 फेब्रुवारी: पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका गोडाऊन मधून 55 किलो चे तब्बल 100 कोटी पेक्षा आढीक ड्रग्स जप्त


-20 फेब्रुवारी: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा. एम डी तयार होत असलेल्या कारखान्यातून 550  किलो असा एकूण 1100 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


20 फेब्रुवारी पुणे शहरा पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवङमध्ये लाखो रुपयांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलंय, पिंपरी- चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय, मध्यरात्री जुना पुणे- मुंबई महामार्गावर या ड्रग्स ची तस्करी सुरू होती. शहजाद आलाम अब्बास कुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलय, त्याच्याकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 


यातील हैदरने पुण्यातील विश्रांतवाडी भैरावनगर या परिसरात एका गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपविले होते. पोलिसांनी 100 ते 200 पोत्यांची तपासणी केली असता हैदरने मिठाच्या पोत्यात लपवलेले 50 किलो पेक्षा मेफेड्रोन मिळून आले. कोणाला संशय येणार नाही अशा लोकवस्त्तीत हैदर ने हे गोदाम भाड्याने घेतलं होतं. ऑक्टोबर पासून हैदर याठिकाणी मिठाच्या पाकिटात ड्रग्स लपवून ठेवत असे.


पुण्याच्या पाठोपाठ कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यातून 550 किलो एम डीचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 650 किलो एम डी ज्याची किंमत 1100 कोटी रुपये एवढा मुद्देमाल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला नायजेरीयन नागरिकाने एम डी ड्रग्स दिले होते. या "प्रीमियम" एम डी ड्रग्स ची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत आहे. अंतराष्ट्रीय बाजारात 500 ग्रॅम एम डी ची किंमत तब्बल 1 कोटी रुपये इतकी आहे. आता या प्रकरणात अंतराष्ट्रीय धागेदोरे नेमके कुठले आहेत आणि नेमके हे ड्रग्स कुठून येतं होते आणि कोणाला याची विक्री केली जात होती याचा तपास सुरू असून राज्यातील विविध भागात पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.


नेमकं हे एम डी ड्रग्स आहे तरी काय?


शाळकरी आणि कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्यॅव म्यॅव’ आणि ‘एम-कॅट’ अशा कोड भाषेत प्रसिद्ध असलेले ड्रग्स म्हणजे एम डी यालाच मेफेड्रॉन असं म्हणतात. हे अमली पदार्थांचे सेवन अनेक वेळा युवा वर्गात असलेले तरुण तरुणी करताना आढळून आलेले आहेत. अवघे एक चिमूट एम डी तुमच्या शरीरात घेतलं तर तुम्हाला नशेची झिंग चढते ज्याला आजची पिढी "किक" म्हणते. अशा अमली पदार्थावर सरकारने बंदी घातली असून त्याचे सेवन आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर शिक्षा देखील कायद्यात केली गेली आहे.



ललित पाटील एकमेव नव्हता आणि इथून पुढे देखील नसेल हे पोलीसांच्या या कारवाईतून स्पष्ट झालं आहे.  हे वास्तव बदलायचे असेल तर पोलिसांबरोबर तरुणांच्या पालकांनी देखील त्यांची जबाबदारी उचलून लहान वयात असतानाच अमली पदार्थांचा धोका मुलांना समजून सांगायला हवा. त्याचबरोबर औषध कंपन्यांच्या नावाखाली काय चालत याची तपासण्यात काम औद्योगिक विभागाने देखील पार पाडायला हवी. तरच तरुण पिढीला ड्रगच्या विळख्यातून आपण वाचवू शकणार आहोत.


इतर महत्वाची बातमी-


HSC Exam : उद्यापासून बारावीची परीक्षा; परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार; गैरप्रकार टाळण्यासाठी 271 पथक तैनात, विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या सूचना कोणत्या?