पुणे : पुणे शहर सध्या ड्रग्स कॅपिटल बनत  (Pune drugs)  असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून दोन कारवायांमध्ये 1100 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीमधील एका फॅक्टरीमधून 600 किलोच्या आसपास साठा जप्त केला आहे. ही आतापर्यंतची सगळ्या मोठी कारवाई समजली जात आहे. 


पुण्यातून विविध परिसरातून ड्रग्स जप्त केल्यानंतर वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया (वय 35) आणि हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता एक एक माहिती समोर आली. त्यानुसार विश्रांतवाडी आणि कुरकुंभमध्ये छापा टाकला. कुरकुंभमध्ये हा ड्रग्सचा कारखाना असल्याचं एका आरोपीच्या चौकशीत समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. पोलिसांच्या पथकाने थेट कुरकुंभमधील कारखान्यात छापा टाकला. यात थेट 600 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन असल्याचं समोर आलं. पोलिसांनी सगळा ड्रग्स साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन केमिकल एक्सपर्ट ताब्यात घेतले आहेत. या कंपनीच्या साबळे नावाच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही फार्मसुटीकल कंपनी आहे. याठिकाणी औषधांची निर्मिती केली जात होती. पहिल्या कारवाईत 55 किलो तर तिसऱ्या कारवाईत 600हून जास्त किलो एवढा साठा जप्त केला आहे.  त्याची किंमत 1100 कोटी रुपये आहे. 


यासोबतच मुंबईमधील पॉल आणि ब्राऊन नावाच्या दोन ड्रॅग पेडलर अर्थात ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. पुण्यात जप्त केलेले मेफेड्रोन या दलालांमार्फत संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात वितरित केले जाणार होते. त्या दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके मुंबई आणि दिल्लीला रवाना करण्यात आलेली आहेत. हैदर याने भाड्याने घेतलेल्या विश्रांतवाडी मधील या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. मीठ निर्यात करण्याच्या नावाखाली मेफेड्रोनची तस्करी केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. 


 पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई?


ललित पाटील प्रकरणानंतर पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. येत्या काळात मोठं ड्रग्स रॅकेट समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : पुणे ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट! आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड, मुंबई कनेक्शन आलं समोर