दौंड, पुणे : शहर ड्रग्सच्या  (Pune drugs)  विळख्यात सापडलं आहे.   पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे (Pune)  पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) मिळून आला आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे त्यानंतर आता दौंड एमडी ड्रग्सचे कनेक्शन कुरकुंभ एमआयडीत आढळले आहेत. पुणे शहर पोलिसांचा 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकला आहे. 


दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीवर पुणे शहर पोलीसांनी धाड टाकली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रींन(एम डी) ड्रग सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे शहर पोलिसांनी 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकलाय. सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. कुरकुंभ एमआयडीसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेकवेळा अशा धाडी टाकण्यात आल्या असून या कंपनीत आणखी किती ड्रग साठा आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. 


पुण्यात जप्त करण्यात आलेल्या  आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे  विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस सखोल तपास करत आहे. त्यासाठी पोलिसांची काही पथकं अनेक ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. 
 


पिंपरी-चिंचवडमध्ये 16 लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे शहरा पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवडमध्ये लाखो रुपयांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलंय, पिंपरी- चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय, मध्यरात्री जुना पुणे- मुंबई महामार्गावर या ड्रग्स ची तस्करी सुरू होती. शहजाद आलाम अब्बास कुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पैकी 5 लाख 40 हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स आढळेत. आरोपी विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यात मागील काही दिवसांत ड्रग्स तस्करीचं प्रमाणत चांगलंच वाढलं आहे. ड्रग्स तस्करांना अटक करुन शिक्षा जरी केली तर त्यांचं रॅकेट मात्र सुरु आहे. पुणे पोलीस हे रॅकेट उद्ध्वस्त करुन शेवटच्या तस्करांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातदेखील अनेक धागेदोरे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. ड्रग्स मुंबई आणि परदेशी पाठवण्यात येणार असल्यानं हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट नेमकं कुठंपर्यंत पसरलं आहे?, याची पोलीस सखोल चौकशी करत आहे. एक एका आरोपीकडून सगळी माहिती घेतली जात आहे.