एक्स्प्लोर

Pune Crime News : पुणे CRPF कॅम्पसमध्ये जवानाने गळफास घेत संपवलं आयुष्य

 पुण्याच्या तळेगाव (Pune) येथे सीआरपीएफ (CRPF) वायरलेस विभागातील जवानाने गळफास (Pune Crime) घेऊन आत्महत्या केली आहे. अमरेशकुमार गिरी (Amreshkumar Giri) असं आत्महत्या केलेल्या जवानाच नाव आहे,

Pune Crime News:  पुण्याच्या तळेगाव (Pune) येथे सीआरपीएफ (CRPF) वायरलेस विभागातील जवानाने गळफास (Pune Crime) घेऊन आत्महत्या केली आहे. अमरेशकुमार गिरी (Amreshkumar Giri) असं आत्महत्या केलेल्या जवानाच नाव आहे. अमरेश हे नुकतेच सुट्टीवरुन आले होते, काल मंगळवारी (20 सप्टेंबर) कर्तव्यावर हजर झाले होते. वायरलेस विभागाच्या स्टोअर रुममध्ये जाऊन त्यांनी केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाही. 

अमरेशकुमार गिरी असे मृताचे नाव आहे. मृत हा मूळचा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील आहे, असं पिंपरी चिंचवड हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. गिरी हे पुणे शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ कॅम्पसच्या वायरलेस कम्युनिकेशन युनिटमध्ये तैनात होते.

गिरी सोमवारी रजेवरून परतले होते आणि मंगळवारी त्यांना दुपारची ड्युटी देण्यात आली होती. सकाळी 10.15 च्या सुमारास ते कॅम्पसमधील स्टोअर रुममध्ये मृतावस्थेत आढळले. प्राथमिक तपासात आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. आम्ही या घटनेपर्यंतच्या घटनाक्रमाचा तपास सुरु केला आहे, असं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत प्राथमिक तपासणीत कोणतीही नोंद सापडलेली नाही. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या आत्महत्येत वाढ?
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुनील शिंदे असं 48 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होतं. शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती मध्ये राहायला होते. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले मात्र सकाळपासून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. मुलाने वडील आवाज देऊन सुद्धा दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला लटकून गळफास घेतल्याचे मुलाला निदर्शनास आलं होतं. याबाबत त्यांच्या कुटुंबियाकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या सुनेने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्या प्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. यात त्यांच्या मनाप्रमाणे चर्चा फ्रेम झाला नव्हता. या सगळ्याचं त्यांनी टेन्शन घेतलं. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Embed widget