Pune CNG Rate: सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; पुण्यात सीएनजीचा दर 91 रुपयांवर
पुण्यात गुरुवारपासून CNG दरात 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासूनची ही सातवी दरवाढ आहे. 91 रुपये प्रति किलोने पुण्यात सीएनजी विकला जात आहे.
Pune CNG Rate: पुण्यात (Pune) गुरुवारपासून CNG दरात 6 रुपयांनी वाढ (Rate increase) करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासूनची ही सातवी दरवाढ आहे. 91 रुपये प्रति किलोने पुण्यात सीएनजी विकला जात आहे. पेट्रोलच्या (Petrol) दरात 8 पैशांनी आणि डिझेलच्या 7 पैशांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच देशांतर्गत ड्रिल केलेल्या वायूच्या स्रोतातील नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर या किंमतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
रशिया आणि युक्रेनकडून पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे सीएनजीच्या दरांवर परिणाम होत आहे. काही वायू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून खरेदी केला जात आहे, ज्यामुळे भारतातही टंचाई निर्माण होत आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर कमी होतील, असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) तर्फे सांगण्यात आलं आहे.
किती भाववाढ झाली आहे?
पेट्रोल ₹105.91 (प्रति लिटर ₹00.08 ने वाढले)
पॉवर ₹111. 57(प्रति लिटर ₹00.8 ने वाढ)
डिझेल ₹92.43 (प्रति लिटर ₹00.07 ने वाढले)
CNG ₹91. 00 (प्रति किलो ₹ 6 ने वाढ)
नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे आणि डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच, त्यापूर्वी 29 एप्रिल रोजीही दरांत वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सीएनजीच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळे सीएनजीच्या किमती आता पेट्रोलच्या किमतींशी स्पर्धा करतात की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.