एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडीयो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पुण्यातील रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येरवडा परिसरात शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी केली आहे.

Pune Crime News: पुण्यातील रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येरवडा परिसरात शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी केली आहे.  येरवडा येथील हाणामारीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भररस्त्यातीत हाणामारीचा प्रकार घडलेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये जागेसाठी वाद झाला होता. या वादावरुन ही हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही गटात हाणामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील आजुबाजूच्या सामानाची तोडफोड केली आहे. या हाणामारीमुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम दोन्ही गटाकडून करण्यात आलं आहे. दोन्ही गटाने काठीने एकमेकांवर वार केले आहेत. त्यामुळे येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

सध्या पुणे शहरात स्टंटबाजी, फ्री स्टाईल हाणामारी, खूनाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नागरीक संतापले आहे. भर रस्त्यात हे प्रकार घडत असल्याने नागरीकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. दोन दिवसांपुर्वी नाना पेठेत अक्षय वल्लाळ नावाच्या तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करत त्याचा भररस्त्यात त्याचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना हाणामारीची घटना समोर आली आहे.

यापुर्वी औरंगाबाद शहरातील पैठणगेट भागातील सब्जी मंडी परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी दोन्ही बाजूने दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव आमने-सामना आल्याने झालेल्या मारहाणीत काही जखमी सुद्धा झाले होते. तर यावेळी वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती. याप्रकरणी दोन्हीं गटांच्या तक्रारीवरून एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच पोलिसांनी दिलेल्या वेगळ्या फिर्यादिवरून दोन्ही गटातील दीडशे ते दोनशे लोकांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Embed widget