एक्स्प्लोर

कुटुंबातील वादाच्या चर्चेनंतर दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या मुलाची फेसबुकवरील भावनिक पोस्ट चर्चेत

दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचा मुलगा आदित्य जगतापने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. यात आम्ही शेवटपर्यंत एक आहोत,असा आशय लिहिण्यात आला आहे.

Chinchwad Bypoll election :   दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap)  आणि लहान भाऊ शंकर जगताप  (Shankar Jagtap)  या दोघांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या उमेदवारीवर (chinchwad bypoll election) दावा केला आहे. त्यानिमित्ताने जगताप  कुटुंबातील वादाचा पहिला अंक जाहीरपणे समोर आला असल्याची चर्चा झाली. याच सगळ्या चर्चेवर दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचा मुलगा आदित्य जगतापने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

आदित्य जगतापने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत,असा आशय आणि सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही अपलोड केलेले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर यांच्यात उमेदवारीवरून वाद असल्याचे समोर आले होते. लक्ष्मण जगतापांच्या निधनाला एक महिना उलटताना कुटुंबातील वादाची चर्चा समोर आली आहे. त्याचअनुषंगाने लक्ष्मण जगतापांच्या मुलगा आदित्यने फेसबुकवर कुटुंबाच्या फोटोसह "जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत." अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. आदित्यच्या या भावनिक पोस्टनंतर या वादावर पडदा पडेल का? याकडे लक्ष आहे.

कुटुंब एकत्र मात्र समर्थकांचं सोशल मीडिया वॉर?

अश्विनी जगताप आणि शंकर जगताप  दोघांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर दोघांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जगतापांच्या समर्थकांंमध्येही दोन गट पडल्याचं चित्र समोर आलं आहे.  दोघांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर काही पोस्ट करायला सुरुवात केली आहे. समर्थकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर समर्थन दर्शवलं आहे. त्यात वेगवेगळ्या टॅगलाईन वापरल्या आहेत. अश्विनी जगताप यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या इमेजमध्ये "आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा" असा आशय लिहिण्यात आला आहे. तर शंकर जगताप समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर, "एक ही कार्यकर्ता 'लक्ष्मण' रेषा ओलांडणार नाही, आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच." असा आशय लिहिण्यात आला आहे. 

चिंचवड आणि कसबा मतदार संघात अद्याप कोणत्याही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली नाही आहे. मात्र सगळ्या  पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. सगळ्याच पक्षात इच्छूकांची मोठी यादी आहे. त्यात महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आता या दोन्ही मतदार संघात उमेदवारीचा दावेदार कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget