एक्स्प्लोर

Chandrakant Patil On Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला; चंद्रकांत पाटलांनी घेतली तानाजी सावंतांची बाजू

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं मत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Chandrakant Patil On Tanaji Sawant :  आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी एखादं वाक्य म्हटलं की त्याची मोडतोड करून ते समोर आणलं जातं.  ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो. माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी होते किंवा तानाजी सावंत असं वक्तव्य करतात त्यावेळी उठसूट गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही, असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बाजू घेतली आहे.

तानाजी सावंतांची भाषा ग्रामीण भागातील लोकांना चांगली समजते. मराठा समाजाला (maratha reservation) आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यानंतर ते रद्द केल्यानंतर अडीच वर्षात कोणीही आंदोलनं केली नाहीत किंवा मोर्चा काढण्याची भाषा केली नाही, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मात्र अनेकांनी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यावरुन आक्रमक झाले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

'PFI कारवाईबाबत पोलिसांवर ताण आणू नका'
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या विषयाची आपल्याला अपुरी माहिती असेल तर आपण काही म्हणू नये. गृहमंत्री कायद्याचे तज्ञ आहेत त्यामुळे ते योग्य भूमिका घेतात. त्यामुळे या विषयावर  मी माझं मत व्यक्त करणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे की नाही हा गंभीर विषय आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे, पोलिस प्रशासनावर कोणीही ताण आणू नये. तुम्ही काय करता?  असं पोलिसांना सातत्याने विचारू नये, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं. 

'स्वयंशिस्त बाळगून नवरात्रोत्सव साजरा करा'
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी सुख आणि समाधान मागितलं आहे. मी असं आवाहन करेन की लोकशाही जशी चांगली आहे तशीच तिचा अतिरेक झाला तर ती घातकही आहे. त्याच प्रकारे निर्बंध असणं किंवा नसणं हा वेगळा विषय आहे. मात्र आपली स्वयंशिस्त असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वयंशिस्त बाळगून नवरात्रोत्सव साजरा करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
मराठा आरक्षणावरुन आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?", असं वक्तव्य तानाजी सावंत  यांनी केलं होतं. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र जर माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माहेरून पैसे आणण्याचा तगादा, नंतर पत्नीला बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती; नकार देताच सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून तीन तलाक
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून आधी 15 लाखांचा तगादा, मग बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : मंत्रिपद हुकलं, केंद्रीय स्तरावर भुजबळांना कोणता जबाबदारी?Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोपTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP MajhaMaharashtra Minister Bungalow : महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माहेरून पैसे आणण्याचा तगादा, नंतर पत्नीला बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती; नकार देताच सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून तीन तलाक
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून आधी 15 लाखांचा तगादा, मग बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
Video: विनोद कांबळीला नेमकं काय झालंय? डॉक्टरांनी दिली माहिती; क्रिकेटपटूने गायलं 'हे' गाणं, सगळेच भावूक
Video: विनोद कांबळीला नेमकं काय झालंय? डॉक्टरांनी दिली माहिती; क्रिकेटपटूने गायलं 'हे' गाणं, सगळेच भावूक
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
Embed widget