एक्स्प्लोर

Pune Crime : मासिक पाळीचं रक्त विकण्याचा प्रकार भयंकर...; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

विज्ञानाच्या युगात जादुटोण्यासाठी (Pune Crime) सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकणं हा अघोरी आणि भयंकर प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी व्यक्त केली आहे.

Pune Crime : विज्ञानाच्या युगात जादुटोण्यासाठी (Pune crime) सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकणं हा अघोरी आणि भयंकर प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. बीडमधील घडलेल्या या किळसवाण्य़ा प्रकारासंदर्भात पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असा आदेश दिला आहे.असा आघोरी प्रकार करत असताना भीती का वाटत नाही किंवा कायद्याची तरी भीती वाटली पाहिजे."

काय आहे प्रकरण?

बीडमधील विवाहित (Black Magic) महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी तिच्या माहेरी म्हणजे पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते भरुन 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

संबंधित बातमी

 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget