एक्स्प्लोर

Pune Cat Birthday:  पुणेकरांचा काही नेम नाही! थेट मनी माऊचा बड्डे केला दणक्यात साजरा; मांजरीच्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा

वाढदिवस साजरा करण्यात आलेली मांजर खरात कुटुंबीयांचा महत्वाचा भाग बनली आहे.

Pune Cat Birthday: पुणे तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. पुणेकरांची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कायम चर्चेत असते. कधी तलवारीने केक कापत, कधी वृक्षारोपण करुन तर कधी वृद्धाश्रमाला भेट देऊन पुणेकर वाढदिवस साजरा करतात. मात्र यावेळी पुणेकरानं  थेट मांजरीचा वाढदिवस साजरा केला आहे. मिली असं या मांजराचं नाव आहे. पुण्यातील खरात कुटुंबीयांनी सोसायटीतील लहान मुलांना बोलावून मांजरीचा वाढदिवस जोमात साजरा केला आहे.

वाढदिवस साजरा करण्यात आलेली मांजर खरात कुटुंबीयांचा महत्वाचा भाग बनली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा जसा वाढदिवस साजरा केला जातो. तसाच वाढदिवस त्यांनी घरातील मांजरीचा करायचा असं ठरवलं. गेल्या 8 वर्षापासून मिली नावाची मांजर खरात कुटुंबात राहते. शेजारच्या लहान मुलांना बोलावून केक कापत मांजरीचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे.

मांजर हा लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीची असते. त्यात पुणेकरांना वेगवेगळ्या जातीच्या मांजरी पाळायचा छंद कायम दिसून येतो. मांजरींच्या करामतीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त बघितल्या गेलेल्या व्हिडीओंची संख्या बघितली तर त्यात अधिक व्हिडीओ मांजरींचे असतात. त्यामुळे मांजरी कायमच्या सोशल मीडिया सेन्सेशन आहेत.

विद्यापीठात कुत्र्याचा वाढदिवस साजरा
पुणे विद्यापीठात एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला 'खंडू' नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात होता.पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 'खंडू' नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा होता. यासाठी तीन दिवसांपूर्वी फ्लेक्स लावण्यात आला होता. मोठा केक कापून फटाके फोडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यामुळे 'खंडू' नावाच्या कुत्र्याची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती.

पुणे विद्यापीठात 'खंडू' नावाचा कुत्रा चांगलाच प्रचलित आहे. याआधी देखील त्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून वाचवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या 'खंडू'वर विशेष प्रेम आहे.पुणे विद्यापीठाचा 'जिगरबाज', 'धाडसी' आणि 'कर्तव्यदक्ष', अशी या खंडूची ओळख आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा करण्याचं ठरवलं होतं. या वेळी एक फ्लेक्स लावण्यात आला होता आणि त्या फ्लेक्सची चर्चा सगळ्या विद्यापीठात  होती. विद्यार्थ्याने असा अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यापीठात चांगलीच चर्चा रंगली.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

Embed widget