एक्स्प्लोर

Pune PFI News: 'पीएफआय'चे बेकायदेशीर आंदोलन; 60 ते 70 कार्यकर्त्यांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

परवानगी नसताना केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Pune PFI News: पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीरपणे आंदोलन केलं. या आंदोलनाला बंड गार्डन पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बेकायदेशीर आंदोलन केलं. परवानगी नसताना केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार या सगळ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोजक्या चार लोकांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, अशा सूचना पोलिसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या.  मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटसमोर तसंच बोल्हाई चौकात जमले. त्यांनी तेथील रस्ता अडवला. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी झाली. प्रत्येक कार्यकर्ता फोन करुन इतर कार्यकर्त्यांना बोलवत होते. जमावाकडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी लगेच कारवाई करायला सुरुवात केली होती. 

अब्दुल कयूम शेख, रझी अहमद खान दोघांना अटक
दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरवल्याच्या संशयावरुन राज्य दहशतवादी विरोधी पथकाने पीएफआय या संघटनेच्या कोंढव्यातील कार्यालयावर छापा टाकला. त्यात पुण्यातील पीएफआयच्या दोन महत्वाच्या नेत्यांना राहत्या घरातून अटक केली होती. अब्दुल कयूम शेख, रझी अहमद खान अशी या दोघांची नावं होती. राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मोठमोठ्याने घोषणा देऊन वाहनांना अडथळा निर्माण केला. पोलिसांच्या सूचनांचं पालन कार्यकर्त्यांनी केले नाही. त्यामुळे लगेच पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नोटीस देऊन सोडलं होतं.

एकाच वेळी अनेक ठिकाणी केली होती छापेमारी

एनआयए, ईडीसह स्थानिक तपास यंत्रणांकडून देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. केरळमध्येच 50 ठिकाणी छापेमारी केली होती. त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापेमारी करण्यात आली. काही राज्यांमध्ये पीएफआयचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होती. काहींना अटकही करण्यात आली होत

महत्वाच्या बातम्या...

NIA-ATS विरोधात निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर जालना,बीडमध्ये गुन्हे दाखल

 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget