पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Highway) आज मोठी दुर्घटना टळली आहे. खाजगी बसने अचानक (Burning Car) पेट घेतला होता. टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याची माहिती आहे. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवलं त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे, सगळे प्रवासी सुखरुप आहे.  आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे.


सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत साडे सातच्या दरम्यान खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळे बस जागेवरच पेटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतवरून दिलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सगळे प्रवासी सुखरुप बचावले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली.


मोठी दुर्घटना टळली...


बसचा अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना झाली असती. अनेक प्रवासी दगावण्याची भीती होती. त्यात सर्व वयोगटातील प्रवाशांचा समावेश होता. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि मोठा अपघात टळलाय. 


सकाळीच बर्निग कारचा थरार...


साधारण 38 प्रवासी या बसने प्रवास करत होते. हे सगळे जीव मुठीत घेऊन बस खाली उतरले. त्यानंतर या सगळ्यांनी बर्निंग बसचा थरार अनुभवला. साधारणपणे ही बस पेटल्याने मोठा अपघात टळला. मात्र आम्ही वेळेत बसमधून खाली उतरल्याने आमचा जीव वाचला नाहीतर आज मोठा अनर्थ घडला असला, असा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय ही आग एवढी मोठी होती की साधारणपणे अर्धातास ही आग विझवण्यासाठी लागलेल. त्यातच रस्त्यातच बस पेटल्याने काही वेळ वाहतूक थांबवावी लागली होती आणि त्याचमुळे सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांनी बर्निंंग कारचा थरार अनुभवला.


 




इतर महत्वाची बातमी-


Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी


Ravindra Dhangekar : पुण्यात महाविकास आघाडीत धूसफूस सुरुच; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये


वादावादीमाधवराव शिंदेंच्या मृत्यूबाबत उदयनराजेंचं मोठं विधान, काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले...