एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बैलगाडा शर्यतीवरील बंदी नवीन सरकार हटवेल या विश्वासापोटी खरेदी केला बैल, किंमत पाहून थक्क व्हाल

त्यांच्याकडील जनावरांची निगा स्वतःच्या मुलांप्रमाणेच राखतात. ही बाब लक्षात घेऊन ते गेली पाच वर्षे बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. गेल्या सरकारने केलेला भ्रमनिरास हे नवं सरकार करणार नाही, असा ठाम विश्वास जाधव कुटुंबियांना आहे.

मावळ : पुण्यातल्या बैलगाडा मालकाने तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजारांचा बैल खरेदी केला आहे. राज्यातील नव्या सरकारवरील विश्वासापोटी ही खरेदी केली आहे. इतके पैसे मोजून खरेदी केलेला हा बैल शर्यतीच्या घाटावर अधिराज्य गाजवणारा आहे. पण सध्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी आहे, ती बंदी महाविकासआघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार हटवेल असा त्यांना ठाम विश्वास आहे. कर्नाटक येथे जन्मलेला हा बैल बेरड म्हैसूर या जातीचा आहे. टोकदार शिंगं, काळ्या नख्या अन पातळ सणसणीत यष्टी ही त्याची खासियत आहे. शर्यतीच्या घाटात येताच क्षणी जशा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे फिरतात अगदी तसंच तो त्याच्या 'मॅगी' या नावाने ही प्रसिद्ध आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे, मॅगी अवघ्या काही सेकंदात घाटावर अधिराज्यही गाजवतो. त्याची ही किमया पाहून भल्याभल्यांना भुरळ पडली आहे. हरी पवार हे त्याचे मूळ मालक. आता त्याचा पत्ता हा पुण्याच्या मावळमधला झाला आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील प्रताप जाधवांनी तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजारांना हा मॅगी खरेदी केला आहे. त्याला स्वतःच्या घरचा सदस्य बनवला आहे. तो घरी आल्यापासून त्यांच्यात जणू दिवाळीच साजरी होऊ लागली आहे. त्याची निगा देखील तशी राखली जात आहे. दूध, अंडी, चारा, भरडा अन् आंबवण असा मॅगीला खुराक पुरवला जात आहे. शिंगे टोकदार राहावीत म्हणून ती तासली जातात, रोज गरम पाण्याने अंघोळ ही घातली जाते. अगदी घरचा सदस्य असल्याप्रमाणेच मॅगीची काळजी घेतली जात आहे. जाधव कुटुंबीयांना गेल्या तीन पिढ्यांपासून बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. म्हणूनच ते त्यांच्याकडील जनावरांची निगा स्वतःच्या मुलांप्रमाणेच राखतात. ही बाब लक्षात घेऊन ते गेली पाच वर्षे बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. गेल्या सरकारने केलेला भ्रमनिरास हे नवं सरकार करणार नाही, असा ठाम विश्वास जाधव कुटुंबियांना आहे. त्याच विश्वासापोटी त्यांनी तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयांची मॅगीवर बोली लावली. सध्या मॅगीचा हा थाट पाहण्यासाठी पै-पाहुणे, बैलगाडा मालक-चालक अन शर्यत प्रेमींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. मॅगीसोबत काढलेले फोटो, सेल्फी अन टिकटॉकचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. साधारण शर्यतीचे बैल हे एक ते तीन लाखाच्या दरम्यान खरेदी केले जातात. मात्र महाविकासआघाडीचे सरकार येणार याची निश्चिती होताच, जाधव कुटुंबीयांनी अधिकचे तेरा लाख मोजले अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या सरकारकडे जनतेतून आलेली ही पहिलीच मागणी आहे. बैलगाडा मालकांनी मोठ्या विश्वासाने केलेल्या या मागणीला हे सरकार गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्वाचं राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
Embed widget