अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची (Baramati Agro Factory ) चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे. राम शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आलीय. 


15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश  देण्यात आले होते. परंतु, रोहित पवार यांच्या  बारामती ॲग्रो लि.  हा कारखाना 10 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच आज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या माणीचे निवेदन दिले आहे. राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून याबाबतची माहिती दिली आहे. 


काय म्हटले आहे राम शिंदे यांनी?
"या वर्षीचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्याचे शासनाचे आदेश डावलून नियमाचे उल्लंघन केले आणि आज 10 ऑक्टोबर 2022 रोजी बारामती ॲग्रो लि. शेटफळगडे (ता. इंदापूर जि. पुणे)  कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांच्याकडे केली, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.  



महत्वाच्या बातम्या


राज्यातील सत्ताबदलाचा बारामती अॅग्रोला दणका, आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्वावर चालविण्याचा मार्ग मोकळा 


'आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही'; चंद्रकांत दादांचं वक्तव्य, रोहित पवार म्हणाले.... 


अजितदादा आणि 'केबिन'...! 'त्या' यादगार प्रवासाचा राजेंद्र पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा