बारामती, पुणे : राज्यात बारामती लोकसभा (Baramti Loksabha Constituency) मतदार संघाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) डोकदुखी कमी करत नसताना आता हर्षवर्धन पाटलांनी (harshawardhan patil) बारामतीमध्ये टेन्शन वाढवलं आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवारांवरुन वादावादी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील वाद समोर आल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षाची समन्वयक बैठक बोलावण्यात आलेले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बारामतीतील कवी मोरोपंत सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित असतील. परंतु या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याने चर्चना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी मित्र पक्षाची लोक धमकी देतात, दमदाटी करतात सोबतच अर्बट बोलत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर महायुतीत नेमकं चाललंय काय? अशी चर्चा रंगली. हर्षवर्धन पाटलांनी पत्रातून आरोप केले होतेच मात्र त्यांची मुलगी अंकिता पाटीलनेदेखील अजित पवारांवर आरोप केले होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मात्र महायुतीचं टेन्शन वाढलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वयक बैठकीचा आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या बैठकीला हर्षवर्धनपाटील उपस्थित नसणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या घरात लग्नसोहळा असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाही आहे.
त्यासोबतच माजी मंत्री विजय शिवतारेंनी दोन दिवसांपूर्वी अजित पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदार संघावर शड्डू ठोकला आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या दाट शक्यता असल्याचं बोललं जात होतं. त्यासोबतचमी बारामतीतून लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठकीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुण्यातील रुग्णालयात मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहूल शेवाळेंनी शिवतारेंची भेट घेतली होती. त्यानंतर शिवतारेंनी आपला निर्णय अद्याप मागे घेतला नाही आहे. मात्र समन्वय समितिच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाही आहे.
महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं, असा महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच बैठकीत देखीलयावरच चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आता दोन्ही नेते कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्यावचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
मोठी बातमी : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटणार?; मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, पवार आज दिल्लीत