Mahayuti Seat Sharing  Meeting : निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) जाहीर केल्या असून, अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा काही सुटला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे ही अंतिम बैठक असून, त्यानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीची दिल्लीतील आजची बैठक महत्वाची समजली जात असून, या बैठकीला अमित शाह (Amit Shah) देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


लोकसभा निवडणुकीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्रित महायुतीत निवडणूक लढवणार आहेत. मात्र, महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना आणि अजित पवारांनी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 10 मतदारसंघावरून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत आज अंतिम निर्णय घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवला जाण्याची दाट शक्यता आहे. 


इच्छुकांचा हिरमोड...


लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी महायुतीमधील अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने काही मतदारसंघात संभ्रम आहे. आपल्या पक्षाला आणि त्यातला त्यात आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे महायुतीमधील इच्छुकांचा हिरमोड पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील इच्छुकांनी संख्या अधिक आहे. 


संभाजीनगरच्या जागेवरून रस्सीखेच...


छत्रपती लोकसभा मतदारसंघावरून देखील महायुतीत एकमत होत नसल्याने भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजप -शिवसेना युतीत पारंपारिक पद्धतीने हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, आता भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. स्वतः अमित शाहांनी संभाजीनगरच्या सभेत अप्रत्यक्षपणे या मतदारसंघावर दावा केला होता. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी तयार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत या मतदारसंघावर देखील चर्चा होऊ शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Lok Sabha 2024 : नाशकात गोडसेंविरुद्ध सक्षम उमेदवार देण्यासाठी मविआचा मास्टर प्लॅन, 'या' बड्या नेत्याला लोकसभेचं तिकीट?