Premanand Maharaj : वृंदावन येथे स्थित असलेले प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) आपल्या सहज आणि प्रभावशाली प्रवचनासाठी ओळखले जातात. आजच्या तरुण पिढीवर त्यांचा विशेष प्रभाव आहे. त्यांचं प्रवचन फक्त भक्तीपर्यंतच मर्यादित नाही तर जीवनाची दिशा बदलवणारे संकेतही देतात. प्रेमानंद महाराजंची ख्याती देशभरात पसरली आहे.
वृंदावन महाराजांच्या प्रवचनासाठी तसेच, आपल्या समस्या घेऊन अनेकजण त्यांच्या आश्रमात जातात. प्रवचनात अनेक भक्त त्यांना प्रश्न विचारतात. असाच एक प्रश्न एका भक्ताने महाराजांना विचारला असता. महाराजांनी जे उत्तर दिलं त्याने सगळेच अचंबित झाले.
भक्ताने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला की, जर कोणी आपली चूक मान्य करत असेल, त्याबद्दल पश्चात्ताप करत असेल आणि आपल्या आयुष्यात काही बदल करत असेल तर त्या व्यक्तीला माफ करावं की करु नये?
भक्ताच्या प्रश्नाला महाराजांनी दिलं उत्तर
भक्ताच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, एखाद्याने चूक केल्यास ती व्यक्ती जर तुमची माफी मागत असेल तर त्या व्यक्तीला माफ करावं. कारण एखाद्याला माफ केल्याने फक्त समोरच्या व्यक्तीलाच नाही तर स्वत:ला सुद्धा समाधान मिळतं. जर एखादी व्यक्ती मनापासून परिवर्तन करु इच्छिते तर त्या व्यक्तीला माफ करावं. प्रेमानंद महाराज म्हणतात की, व्यक्तीला सुधारण्याचा एक चान्स दिला पाहिजे. कारण आयुष्यात चुका प्रत्येकाकडून होतात. त्यामुळेप प्रत्येक व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे.
मात्र, प्रेमानंद महाराज असेही म्हणतात की, जर व्यक्ती आयुष्यात वारंवार तीच चूक करत असेल तर मात्र त्या व्यक्तीला कधीच माफ करु नये. त्यांनी पुढे म्हटलं की, जर व्यक्तीला खरंच आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप होत असेल, त्यांना सुधारण्याची तयारी असेल तर तो तीच चूक पुन्हा नाही करणार. पण, जर एखादी व्यक्ती एकच चूक पुन्हा पुन्हा करत असेल तर मात्र त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. असं प्रेमानंद महाराज म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :