Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली.यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.

मुकेश चव्हाण Last Updated: 06 Jul 2025 05:33 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा...More

सुनील तटकरे आणि अजित पवार रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, महेंद्र थोरवेंचा आरोप

रायगड ब्रेकिंग 


Slug - सुनील तटकरे आणि अजित पवार रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यांच्याकडील निधी कर्जत मतदार संघात वळवत आहेत... थोरवे यांचा तटकरे यांच्यासह अजित पवार यांच्यावर आरोप



Anchor -रागगडच्या कर्जत मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे यांना शह देणारे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक निधी देत आहेत शिवाय रायगड मध्ये महायुतीची सत्ता असूनही सुनील तटकरे आणि अजित पवार हे जाणीवपूर्वक रायगड मध्ये निधी देत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय 


Byte - महेंद्र थोरवे आमदार



लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला यश... योजनेमुळे आमचा ऐतिहासिक विजय... 


लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनेवर कोणताच परिणाम नाही... थोरवे



Anchor, - लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला मोठी उभारी मिळाली आणि सरकारला यश मिळवता आल. त्यामुळे या योजमेमुळे कोणत्याच योजनेवर परिणाम झालेला नाही. शिवाय ही योजना बंद पडणार नाही अस वक्तव्य आमदार थोरवे यांनी केलं. त्यामुले या योजनेवर टीका करणाऱ्यांना थोरवे यांनी चपराक लगावली आहे.तर मंत्री आदिती तटकरे यांच्या या योजनेची आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठराखण केली आहे.


Byte - महेंद्र थोरवे आमदार 


Slug - अजित दादांकडून सुनील तटकरे वाटेल तितका निधी घेऊन जातात... थोरवे यांचा तटकरेवर मोठा आरोप 


रायगड मध्ये महायुतीच्या आमदारांना अजित पवार निधी द्यायला टाळतात... थोरवे 



Anchor  - रागगडच्या विकासाला खिळ बसण्याचे कारण अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत कारण अजित पवार यांच्याकडे वित्त खाते असल्यामुळे सुनील तटकरे हे त्यांना वाटेल तितका निधी घेऊन जात आहेत त्यामुळे रायगड मधील महायुतिच्या आमदार यांना निधी मिळत नाही. आणि त्यामुळे रायगडचा विकास राखडला आहे. निधी वाटपाचा सुरु असलेला घोळ कुठेतरी थांबाव आणि प्रत्येकाला समान निधी वाटप व्हावी याकरिता लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत.


Byte - महेंद्र थोरवे आमदार शिंदे गट



Slug - रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला मिळणार 


आमदार महेंद्र थोरवे यांची विठुराया चरणी साकडं 


Anchor - रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळावं याकरिता शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी साकडं घातलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे काम राष्ट्रवादीला पालकमंत्री पद देण्याच केलं तेच काम देवेंद् फडणवीस यांनी सुद्धा केलं अशी नाराजी थोरवे यांनी रायगडच्या रखडलेल्या पालकमंत्री पदावरून केली आहे. राज्यात सत्ता आणण्यासाठी  आम्ही रायगड मध्ये  जो संघर्ष केला त्याची जाणीव वरिष्ठान्नी ठेवावी असा टोला त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लागावला आहे.शिवसेनेच्या आमदार यांनी केलेला संघर्ष आताचे राज्यकर्ते विसरले आहेत. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री देण्यात यावे अशी मागणी थोरवे यांनी यावेळी केलं.


Byte - महेंद्र थोरवे आमदार