Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनि कर्मांच्या आधारे व्यक्तीला फळ देतात, त्यामुळे त्यांना न्याय देवता म्हटलं जातं. शनीच्या हालचालीचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होत असतो. शनि सध्या कुंभ राशीत अस्त अवस्थेत आहे, परंतु अवघ्या एका दिवसात शनीचा उदय होणार आहे. शनि (Shani) उदयाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होईल, काही राशींसाठी हा काळ शुभ ठरेल, तर काहींसाठी हा काळ वाईट ठरू शकतो.
कधी होणार शनीचा उदय? (Shani Uday 2024 Date)
अवघ्या एका दिवसात शनीचा उदय होणार आहे. 18 मार्च 2024 रोजी शनीचा उदय होत आहे. जून महिन्यापर्यंत शनि उदय स्थितीत राहील. या काळात काही राशींच्या सर्व अडचणी दूर होतील, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. या राशींवर शनीची कृपादृष्टी राहील आणि प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय विशेष फलदायी ठरेल. मेष राशीच्या लोकांना विशेषतः नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होईल. या काळात तुम्ही काही थोर व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकता. प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही प्रगती कराल. या काळात तुमच्या उत्पन्नातही वाढ झालेली दिसेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी शनीचा उदय फार शुभ ठरेल.
मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात दोन्हीकडे चांगले परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या पगारात वाढ होण्याची चिन्हं आहेत, तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळेल. तुम्हाला पैसे कमावण्याच्या आणखी वेगळ्या संधीही मिळतील. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शनि उदयामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असेल. शनीचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. शनीची स्थिती वृषभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात विशेष यश मिळवून देईल. या काळात करिअरमध्ये तुम्हाला काही सुवर्ण संधी मिळतील. शनि तुम्हाला भरघोस आर्थिक लाभ देईल. नोकरी-व्यवसायात तुम्ही प्रगती कराल.
शनिदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ देईल. या काळात नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांना या काळात खूप नफा मिळेल. कोणत्याही अडचणीशिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही यश मिळवू शकाल. तुमचे कौटुंबिक संबंध देखील चांगले राहतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. शनीच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात भरपूर यश मिळेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. या राशीच्या लोकांना एखाद्या ठिकाणाहून चांगल्या नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.
शनि उदय तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरणार आहे. जुन्या सर्व समस्यांमधून तुमची सुटका होईल. या काळात परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. मिथुन राशीचे लोक लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही परदेशात फिरायला जाऊ शकतात.
कन्या रास (Virgo)
शनीच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. कन्या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. कन्या राशींच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा राहणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, तुमच्या संपत्तीत वाढ होईल.
सरकारी नोकरीत असणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. तुम्ही एखादा न्यायालयीन खटला लढवत असाल तर याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कन्या राशीच्या लोकांना आजवर त्यांच्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळत नव्हतं, पण आता शनि त्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ देईल. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: