बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या (Baramati Loksabha Election ) निवडणुकीच्या हालचालींकडे यंदा राज्याच्या प्रत्येक नेत्याचं लक्ष लागलं आहे. बारामतीतून नणंद- भावजय एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर महायुतीकडू सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल या दोघींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती, त्यांच्याकडे असलेल्या आलिशान कार आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती दिली आहे. यातच सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंनी 55 लाखांचं कर्ज घेतल्याचं या प्रतिज्ञापत्रातील माहितीतून उघड झालं आहे. पार्थ पवारांकडून 20 लाख उसणे घेतले आहे तर सुनेत्रा पवारांकडून 35 लाख रुपये उसणे घेतले आहे. 



2022-2023 मध्ये आयकर विवरणपत्रामध्ये दर्शवण्यात आलेले एकूण उत्पन्न - 


सुप्रिया सुळे - 1  कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये


सदानंद सुळे - 3 कोटी 90 लाख 02 हजार 220


रोख रक्कम 


सुप्रिया सुळे - 42 हजार 500


सदानंद सुळे -  56 हजार 200


बँक खात्यातील ठेवी - 


सुप्रिया सुळे - 11 कोटी 83 लाख 29 हजार 195


सदानंद सुळे - 2 कोटी 57 लाख 74 हजार 150


शेअर्समधील गुंतवणूक -


सुप्रिया सुळे - 16 कोटी 44 लाख 24 हजार 140


सदानंद सुळे - 33 कोटी 57 लाख 58 हजार 962



राष्ट्रीय बचत योजना - 


सुप्रिया सुळे - 7 लाख 13 हजार 500


सदानंद सुळे -  16 लाख 34 हजार 030 


कर्ज म्हणून देण्यात आलेली रक्कम - 


सुप्रिया सुळे - 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 


सदानंद सुळे -  60 कोटी 8 लाख 71 हजार 253 



सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे कोणतेही वाहन, जहाज, मोटार नाही..


सोनं - 


सुप्रिया सुळे - 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचं सोनं


सदानंद सुळे - 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपयांचं सोनं


चांदी - 


सुप्रिया सुळे - 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदी


सदानंद सुळे -  17 लाख 62 हजार 72 रुपयांची चांदी


हिऱ्याच्या मौल्यवान वस्तू - 


सुप्रिया सुळे - एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये


सदानंद सुळे -  एक कोटी 62 लाख 74 हजार 253 रुपये


एकूण स्थूल मूल्य - 


सुप्रिया सुळे - 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये


सदानंद सुळे - एक अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये


शेतजमीन बाजरमूल्य


सुप्रिया सुळे - 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये


सदानंद सुळे -  4 कोटी 66 लाख 26 हजार 094 रुपये



सुप्रिया सुळे यांच्यावर कुणाचं किती कर्ज - 


पार्थ पवार - 20 लाख रुपये
सुनेत्रा पवार 35 लाख रुपये


 नणंद भावजया विरोधात उभ्या ठाकल्या...


बारामातीची यंदाची निवडणूक चांगलीच रंजक असणार आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मी शारदाबाईंची नात आहे म्हणत सुप्रियासुळेंनी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवर निशाणा साधला. त्यानंतर कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अनेक विरोधकांना खंबीर असल्याचं दाखवून दिलं. आता दोन्ही उमेदवार पुढच्या प्रचाराला लागल्या आहेत. त्यांच्याकडून पुन्हा एकमेकांवर ताशेरे ओढले जातात का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


sunetra Pawar : कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर?