बारामती, पुणे : पुणे आणि पुणे जिल्ह्यात सध्या कोयता (baramati Crime news) गॅंगची मोठी दहशत पाहायला मिळत आहे. त्यातच बारामती तालुका पुन्हा कोयता गॅंगच्या हल्ल्याने हादरला आहे.  कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या (Koyta gang) मुलाचा निर्घृण खून केला. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बारामतीत चांगलीच खळबळ उडाली आहे. 


कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात युवक चांगलाच गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केलं. 


गावातील एका महापुरूषांच्या जयंतीच्या वेळी झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यासोबत आणखीही अनेक कारणं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  काही दिवसांपूर्वीच बारामतीत चायनीज खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकावर काठी, लोखंडी रॉडने सहा जणांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यास काही दिवस उलटत नाहीत, तोच आता उंडवडी सुपे परिसरात ही घटना घडली आहे.


क्षृल्लक कारणावरुन वाद अन् थेट संपवलं!


पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगच्या हल्ल्यांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यात अनेक वाद हे क्षृल्लक कारणावरुन झाल्याचं समोर आलं आहे. हा हल्लादेखील क्षृल्लक कारणावरुन झाल्याचं दिसून आलं आहे. क्षृल्लक वादावादीने थेट पडशा पाडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हे हल्ले कधी थांबवणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


 
टवाळखोरांना रोखण्याचं आव्हान 


पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे.  या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं  पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ravindra Dhangekar Property : आठवी पास असलेल्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची संपत्ती किती?