एक्स्प्लोर

Pune Bypoll election : कसब्यातील निवडणूक बॅनरमुळेच चर्चेत; कसब्यातील बॅनरबाजीनं भाजपची धाकधुक वाढणार?

चिंचवडनंतर आता बॅनरबाजीचं लोण कसब्यात येऊन पोहचलं आहे. कसब्याची यावेळची निवडणूक प्रचारांपेक्षाही मतदार संघात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे चर्चेत आहेत.

Pune Bypoll election : चिंचवडनंतर.(pune bypoll election)  आता बॅनरबाजीचं लोण कसब्यात येऊन पोहचलं आहे. कसब्याची यावेळची निवडणूक प्रचारांपेक्षाही मतदार संघात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे चर्चेत आहेत. कसब्यात अज्ञातांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात भाजपला निशाण्यावर ठेवून हे बॅनर लावल्याचं बॅनरमधील मजकूरातून स्पष्ट होत आहे. 

कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा आणि तोच आमच्याकडून काढला आता आम्ही दाबणार नोटा (NOTA) असे या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे आहे. या बॅनरवर एका बटूचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. त्यातून योग्य तो संदेश जाईल याची दक्षता घेण्यात आली आहे. सध्या कसब्यात या निनावी लावण्यात आलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही कसब्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपच्या हेमंत रासने यांना देण्यात आली. त्यानंतर ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पुण्यात भाजपकडून ब्राह्मणांना उमेदवारी देण्यासाठी डावललं जात आहे, अशाही चर्चा रंगल्या. कसब्यातून रासनेंना उमेदवारी मिळाल्याने नाराज असलेल्या ब्राह्मणांनी हे कृत्य केलं असावं, असा अंदाज बांधला जात आहे.

ब्राह्मण समाज नाराजीचं कारण देत कसब्यातून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांना या पोटनिवडणुकीसाठी बासरी हे चिन्ह देण्यात आलं आहे. कसब्यात 13 टक्के मतं ब्राह्मणांची आहे. आतापर्यंत कसब्यात अनेक वर्ष ब्राह्मणांची सत्ता होती. त्यामुळे ही 13 टक्के मतं ब्राह्मणांना मिळत होती. मात्र आता हिंदू महासंघ या पोटनिवडणुकीत उतरले असल्याने ही मतं विभागली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शनदेखील वाढण्याचं चिन्ह दिसत आहे.

टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्यावर अशाच प्रकारचा बॅनर शनिवारवाड्याच्या भिंतीला लावण्यात आला होता. त्यावर कुलकर्णीचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदार संघ गेला आात बापटाचा मतदार संघाचा नंबर का?, समाज कुठवर सहन करणार,असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला होता. या बॅनरचीदेखील शहरात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता पून्हा एकदा निनावी बॅनर लावण्यात आल्याने आणि तोही काहीसा भाजपविरोधात आशय लिहून लावण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे बॅनर कोणी लावले, या सगळ्या चर्चांंना उधाण आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget