Pune Bharat Gaikwad Suicide: अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या (Bharat Gaikwad Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर (Baner) परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.


मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वत:चं आयुष्य देखील संपवलं (Suicide) आहे. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त (Amravati ACP) म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यातल्या घरी आले होते.


चतु:शृंगी पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. नेमकी ही हत्या करण्याचं कारण काय? आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


बीडमध्ये मुलानेच केला डॉक्टर बापाचा खून


पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी बीडमध्ये (Beed Murder) घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीड शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉक्टर सुरेश काशिनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा सुधीर कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएसमध्ये पास झाला होता. त्यानंतर तो तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत असताना त्याला अनेक वेळा अपयश आल्याने नैराश्यातून त्याने डॉक्टर असलेले आपले वडील काशिनाथ कुलकर्णी यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्यांची हत्या केली. 


या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून मयत काशिनाथ कुलकर्णी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा:


Manipur Violence: मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ