एक्स्प्लोर

Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

Pune Water : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस (Pune Rain) झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली  आहे. खडकवासला धरणक्षेत्रातील वरसगाव, टेमघर आणि पाणशेत या धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे (Pune Rain) खडकवासला धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 

हवामान विभागाने मुसळधार पावसाची (Pune Rain) शक्यता व्यक्त केल्यामुळे लवकरच धरणसाठी पुर्णत: भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील वरसगाव टेमघर पानशेत आणि चार धरणामध्ये आठवडाभरापासून झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढल्यामुळे पाण्याचं संकट कमी झालं आहे. 

खडकवासला क्षेत्रात आता 11.79 टीएमसी पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी त्याच वेळी हा पाणीसाठा 9.52 टीएमसी इतका होता. पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली असून  हवामान खात्याकडून अजूनही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने लवकरच धरणसाठा पूर्णपणे भरेल अशी शक्यता आहे.

पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट 

आज पुणे शहराला पावसाचा पावसाचा (Pune Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह  पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज


मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सुरू असलेल्या जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. चालू आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे. 

शेतीच्या कामांना वेग


पुण्यासह राज्याच्या काही काही भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणींच्या कामांना सुरूवात केल्याचं चित्र आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Pune Crime:शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
Pune Crime:शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Embed widget